शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खुर्शिपारमध्ये ऐतिहासिक राजकीय भूकंप! लोकांतून निवडून आलेल्या सरपंचाला लोकांनीच पाडले, ६६० विरुद्ध ० मतांनी सरपंचांची उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 16:14 IST

Khurshipar Grampanchayat news: "एकाही गावकऱ्याचा पाठिंबा नाही! खुर्शिपारच्या सरपंचांचा ६६०-० ने ऐतिहासिक पराभव; वाचा सविस्तर काय घडले..."

आमगाव (गोंदिया): आमगाव तालुक्यातील खुर्शिपार ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्याचा अखेर धक्कादायक अंत झाला. सरपंच हेमलता चव्हाण यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल ६६०-० अशा ऐतिहासिक फरकाने मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे, सभेला उपस्थित असलेल्या एकाही मतदाराने सरपंचांच्या बाजूने मतदान केले नाही, ज्यामुळे चव्हाण यांना आपले पद गमवावे लागले आहे.

१९ जानेवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंचांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. तहसीलदारांच्या उपस्थितीत आज आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी आपला रोष मतदानातून व्यक्त केला.

सरपंचांवर झालेले गंभीर आरोप ग्रामसभेत सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी सरपंचांच्या 'मनमानी' कारभाराचा पाढाच वाचला. प्रामुख्याने खालील आरोपांमुळे गावकऱ्यांमध्ये संताप होता:

अनधिकृत प्लॉटिंग: शासकीय जमिनीचे बेकायदेशीर प्लॉटिंग करून आर्थिक व्यवहार करणे.

भ्रष्टाचार: विकासकामात सदस्यांना डावलणे आणि कामांसाठी पैशांची मागणी करणे.

धमकावणे: वकिली पेशाचा धाक दाखवून गावकऱ्यांना धमकावणे आणि विरोधात बोलणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवणे.

बचाव पडला फिकामाजी सरपंच हेमलता चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर अन्याय होत असून जातीपातीचे राजकारण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी त्यांना स्वतःचे मतही राखता आले नाही. ६६० विरुद्ध ० असा निकाल लागताच गावकऱ्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Khursipar Village Sees Political Earthquake: Sarpanch Ousted by Landslide Vote

Web Summary : Khursipar Sarpanch ousted by 660-0 vote after corruption allegations. Villagers accused her of illegal plotting, bribery, intimidation. All accusations were denied but rejected by voters.
टॅग्स :sarpanchसरपंच