शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली : सेनगावात गर्भपाताचा लाखोंचा औषधीसाठा जप्त

By admin | Updated: April 6, 2017 20:32 IST

येथील जय गजानन मेडिकलवर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाच्या सहायक आयुक्तांच्या पथकाने छापा मारून जवळपास दोन लाखांचा गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला.

ऑनलाइन लोकमतसेनगाव (जि.हिंगोली), दि. 6 : येथील जय गजानन मेडिकलवर औरंगाबाद येथील अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाच्या सहायक आयुक्तांच्या पथकाने छापा मारून जवळपास दोन लाखांचा गर्भपाताच्या औषधांचा साठा जप्त केला. तर प्रतिबंधित औषधांचा आठ लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.सेनगाव येथील जय गजानन मेडिकलवर प्रतिबंधित औषधींची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. आयुक्त हर्षदीप कांबळे यांच्याकडे तक्रार गेली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक आयुक्त अमृत निखाडे यांच्या पथकाने गोपनिय पद्धतीने हा छापा मारला. या पथकात परभणी, औरंगाबाद, नांदेड, जालन्याचे ८ अधिकारी आहेत. त्यात मेडिकल दुकानासह दुकान मालक महेश जेथलिया यांच्या घराचीही पथकाने झाडाझडती घेतली. त्यात दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या गर्भपाताच्या किट त्याच्याकडे असल्याचे आढळले. तर त्यापैकी ९३ किट त्याने विक्री केल्या होत्या. याशिवाय शासनाने प्रतिबंधित केलेली सहा ते साडेसहा लाख रुपये किमतीची इतरही औषधी आढळून आली. दुपारी दोन वाजेपासून हे पथक घर व मेडिकल दोन्ही ठिकाणी तळ ठोकून होते. राहत्या घरीच अवैध औषधींचा साठा सापडला. यात प्रतिबंधित झोपेच्या गोळ्या, सेक्ससंबंधित शक्तीवर्धक गोळ्या, कोरेक्स औषधींच्या बाटल्या असा आठ लाखांच्या मालाचा समावेश आहे.एकूण ५00 किट इंदोर येथून नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्या होत्या. त्यापैकी ४0७ जप्त केल्या. तर ९३ विकल्याचे आढळून आले.या ९३ किटबाबत सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल होत आहे. त्या कोणाला विकल्या, त्याचा कसा उपयोग झाला, याची माहिती मिळण्यासाठी ही प्रक्रिया होत आहे.तर जप्त करण्यात आलेल्या मालाबाबत अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधक विभागच तपासणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.मराठवाड्यातील मोठी कारवाईपरळी येथील गर्भपात रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर जेवढा साठा सापडला नव्हता, त्यापेक्षाही जास्त हा साठा आहे. तर मराठवाड्यातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सेनगावातील सर्व मेडिकल दुकाने बंद होती.नवे रॅकेट तर नाही?सेनगावसारख्या अविकसित भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भपातासह प्रतिबंधित औषधांचा साठा सापडल्याने यामागे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलिस तपासासह अन्न व औषधी भेसळ प्रतिबंधकच्या चौकशीतच ही बाब समोर येणार आहे.⁠⁠⁠