शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

सरकारी तिजाेरीत डिसेंबरमध्ये सर्वाधिक महसूल, मुंबईत घरखरेदी वाढल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 07:19 IST

Revenue : गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच या वर्षी मुंबईत मालमत्ता विक्रीने एक लाख घरांचा आकडा पार केला आहे.

- ओमकार गावंड

मुंबई : यंदा डिसेंबर संपण्याआधीच मुंबईतील घर खरेदीमार्फत मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे. मुद्रांक शुल्कात देण्यात आलेल्या सवलतीच्या समाप्तीनंतर पहिल्यांदाच ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला आहे.गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच या वर्षी मुंबईत मालमत्ता विक्रीने एक लाख घरांचा आकडा पार केला आहे. कोरोनाच्या संकटातून बांधकाम क्षेत्र सावरण्यासाठी सरकारने १ सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ दरम्यान मुद्रांक शुल्कात अनुक्रमे २ ते ३ टक्क्यांनी सवलत दिल्यामुळे सवलतीच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये मुंबईत सर्वाधिक घर खरेदी झाली. त्यामुळे या महिन्यात एकूण ८७५ कोटी रुपये महसूल जमा झाला होता. त्यानंतर कोणत्याच महिन्यात ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल जमा झाला नव्हता; परंतु यंदाच्या २६ डिसेंबरपर्यंत मुंबईत ७,७०७ घरांची खरेदी झाली असून त्यातून ६०० कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. 

 महिना     घरखरेदी     महसूल (कोटींत)जानेवारी     १०,४१२    ३०५ फेब्रुवारी     १०,७१२    ३५२मार्च     १७,४४९    ८७५ एप्रिल     १०,१३६    ५१४मे           ५,३६०    २६९जून     ७,८५७    ४२०जुलै     ९,०३७    ५६७ऑगस्ट     ६,७८४    ४२१सप्टेंबर     ७,८०४    ५२९ऑक्टोबर     ८,५७६    ५५०नोव्हेंबर     ७,५८२    ५४९डिसेंबर २६ पर्यंत     ७,७०७    ६०० 

- परवडणाऱ्या घरांची उपलब्धता, गृहकर्जावरील घटलेले व्याजदर, नवीन प्रकल्प लॉन्च होण्यात झालेली वाढ, विकासकांच्या आकर्षक ऑफर्स घर खरेदीदारांना आकर्षित करीत आहेत. अलीकडे मुंबईत मालमत्ता खरेदीचे कोट्यवधींचे व्यवहार पार पडल्याने महसूल चांगला मिळाला आहे.

- मुंबईत मालमत्ता विक्रीने या वर्षी एक लाख घरांचा आकडा पार केला आहे. 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागMaharashtraमहाराष्ट्र