दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मूल्यमापन व्हाॅट्सॲपद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 08:35 AM2021-05-13T08:35:30+5:302021-05-13T08:37:04+5:30

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले, हे जाणून घेण्यात आले.

The highest assessment of 10th class students by WhatsApp | दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मूल्यमापन व्हाॅट्सॲपद्वारे

दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक मूल्यमापन व्हाॅट्सॲपद्वारे

googlenewsNext

पुणे : कोरोना काळात राज्यातील शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याबरोबरच विविध पद्धतीने त्यांचे मूल्यांकन केले आहे. त्यात सर्वाधिक १२ हजार ९३१ शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन व्हॉट्स ॲपद्वारे केले आहे. राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने, दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी शाळा तयार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी नुकतेच सर्वेक्षण केले. त्यात राज्यातील शाळांनी वर्षभर कशाप्रकारे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले, हे जाणून घेण्यात आले. शाळांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाइन टेस्ट, व्हॉट्‌स् ॲप, ऑनलाइन सेशन, ऑफलाइन टेस्ट, गृहभेटी, वर्कबुक आणि अन्य पर्याय वापरले. त्यातील बहुतांश शाळांनी व्हॉट्स ॲप, ऑनलाइन टेस्ट, ऑफलाइन टेस्ट, वर्कबुक आदी वापरून मूल्यमापन केल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

राज्यातील २५ हजार ९२७ शाळांपैकी ५० टक्के म्हणजेच सुमारे १२ हजार ९३१ शाळा सर्वेक्षणात सहभागी झाल्या. यात सर्वाधिक शाळांनी व्हॉट्‌स् ॲपचा वापर केल्याचे दिसून आले. तब्बल १२ हजार २९८ शाळांनी व्हॉट्‌स ॲपचा, तर ९ हजार ९३० शाळांनी ऑफलाइनचा वापर केला आणि ९ हजार ७५८ शाळांनी ऑनलाइन टेस्टद्वारे मूल्यमापन केले आहे. तसेच, ८ हजार ४०२ शाळांनी विद्यार्थ्यांना वर्कबुक देऊन मूल्यमापन केले आहे. 

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करणार किंवा नाही, यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक घेतली जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
 

 

Web Title: The highest assessment of 10th class students by WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.