उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:14 IST2020-09-29T14:08:43+5:302020-09-29T14:14:16+5:30
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीउदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही त्यांनी या ट्विटमधून दिली आहे.
गेले काही दिवस मंत्रीउदय सामंत शासकीय कार्यक्रमांपासून दूर आहेत. रत्नागिरीतील प्रशासकीय कामांचा आढावाही ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी दोन्ही जिल्ह्यात मोहिमेचे काम इतर जिल्ह्यांप्रमाणे चांगले असल्याचेही सांगितले होते.
गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
गेले काही दिवस शासकीय कार्यक्रमांपासून अलिप्त राहणाऱ्या उदय सामंत यांनी मंगळवारी ट्विट करून आपला कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गेले दहा दिवस मी स्वत: क्वारंटाईन आहे. त्यामुळे मी स्वत: कोरोना चाचणी करून घेतली असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले दहा दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्याने संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांना काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
#माहितीसाठी
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
मी विलगीकरण कक्षात असल्याकारणाने शिवसेना राज्य संपर्क कार्यालय 'शिवालय' येथे उद्या बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर रोजी जनता दरबार होणार नाही.कृपया सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.उद्या या ठिकाणी आपल्या समस्यांची निवेदने स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. तसदीबद्दल क्षमस्व:
तसेच मी ठणठणीत असून, पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रूजू होणार असल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सध्या उदय सामंत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपले कामकाज करत आहेत. तसेच त्यांनी मी विलगीकरण कक्षात असल्याने शिवसेना संपर्क कार्यालय शिवालय येथे ३० सप्टेंबर रोजी होणारा जनता दरबार होणार नसल्याची माहितीही सामंत यांनी दिली आहे.