समीरच्या आरोप निश्चितीवर सुनावणी

By Admin | Updated: September 26, 2016 03:39 IST2016-09-26T03:39:19+5:302016-09-26T03:39:19+5:30

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी आज, सोमवारी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा

Hearing of Sameer's allegation | समीरच्या आरोप निश्चितीवर सुनावणी

समीरच्या आरोप निश्चितीवर सुनावणी

कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी आज, सोमवारी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. मात्र उच्च न्यायालयाची दोषारोप दाखल करण्यावर स्थगिती असल्यामुळे सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या सुनावणीसोबतच अवमान याचिका व तावडेच्या सुरक्षा अर्जावरही सुनावणी होणार आहे. पानसरे हत्येप्रकरणी संशयित समीर विरोधात ‘एसआयटी’ने दोषारोपपत्र दाखल केले आहे. याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला अटक करून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पुरावे हाती लागले. हा पुरवणी तपास अहवाल अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा हे २९ सप्टेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hearing of Sameer's allegation