शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 13:30 IST

तामिळनाडूमध्ये ३२ तर महाराष्ट्रात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांची आणि आपली लोकसंख्या यांतही फरक आहे; पण...

अतुल कुलकर्णी -

मुंबई : तामिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशनच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्वतंत्र कॉर्पोरेशन उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. त्याआधी त्यांनी तामिळनाडूचा दोन दिवसांचा विविध अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. या महामंडळाचा राज्याला फायदा होईल. अवास्तव खर्च बंद होईल आणि सरकारची मोठ्या प्रमाणावर बचतही होईल, असे त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव लवकरच आपण मंत्रिमंडळापुढे आणणार असल्याचेही टोपे म्हणाले.तामिळनाडूमध्ये त्यांच्या सरकारच्या एकूण अर्थसंकल्पाच्या सहा टक्के रक्कम आरोग्यावर खर्च केली जाते. महाराष्ट्रात हे प्रमाण १.५ ते २ टक्के आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने औषध खरेदी केली जाते याची आपण माहिती घेतली असे सांगून टोपे म्हणाले, त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय तपासून आधी मागणी घेतली जाते. पुढच्या आर्थिक वर्षाचे नियोजन या वर्षी सप्टेंबरमध्ये पूर्ण केले जाते. सर्व ठिकाणच्या मागण्यांचे फेब्रुवारीपर्यंत संकलन केले जाते. अत्यावश्यक औषधांची यादी निश्चित करून ती प्रकाशित केली जाते. ती सतत अपडेट केली जाते. आपल्याकडे मात्र तीन-तीन वर्षांत ही यादी अपडेट होत नाही. दरवर्षी मार्च महिन्यात टेंडर काढून दर निश्चित केले जातात. मागच्या पाच वर्षांत ज्या औषधांचे टेंडर काढले आहेत, ते औषध मागच्या पाच वर्षांत किती वापरले गेले आणि पुढे किती लागणार आहे, याचाही अभ्यास केला जातो. त्यामुळे स्पर्धात्मक दर येतात. औषधे, उपकरणांची खरेदी, त्याचे स्टोअरेज आणि वितरण ही सर्व जबाबदारी महामंडळाची असते. प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी एक स्टोअरेज तयार केले आहे. तेथून औषधांचे वितरण केले जाते. आपण मोठ्या प्रमाणावर एकदाच खरेदी करतो. त्यातही बऱ्याचदा खालून मागणी आली की नाही याचाही फारसा विचार करीत नाही; पण आता ही पद्धत कपूर्णपणे बदलली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पासबुकची अभिनव कल्पना-  त्यांच्याकडे ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांना कोणती औषधे, किती दिली पाहिजेत, त्यासाठीचे बजेट ठरलेले आहे. या सगळ्यांना त्यांनी एक पासबुक बनवून दिले आहे. -  जेवढ्या रकमेची औषधे त्यांना दिली जातात, त्याची नोंद त्यात केली जाते. जर गरजेपेक्षा जास्त औषधे त्यांनी मागवली तर त्याचीही तपासणी व नोंद होते. -  त्यामुळे अनावश्यक औषधांची खरेदी होत नाही. शिवाय औषधांच्या एक्सपायरी डेटचे विषयही त्यांच्याकडे कधीच उद्भवत नाहीत. महाराष्ट्रात पासबुक पद्धती सुरू करणार आहोत, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अशी आहे यंत्रणा-  तामिळनाडूत औषधांचा व उपकरणांचा पुरवठा झाल्यानंतर गुणवत्ता तपासण्यासाठी एक स्वतंत्र सेल असतो.  -  औषधांचे सॅम्पल एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पाठविले जातात. -  पुन्हा तपासण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेतही ते नमुने पाठवले जातात. दोन्हीच्या अहवालाची तुलना केली जाते. -  खराब औषधे पुरवठा करण्याचा प्रश्नच येत नाही. खराब औषधांचा पुरवठा झालाच तर त्या कंपन्यांना मोठा आर्थिक दंड लावला जातो.

तामिळनाडूमध्ये ३२ तर महाराष्ट्रात १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांची आणि आपली लोकसंख्या यांतही फरक आहे; पण तमिळनाडूने महामंडळाच्या माध्यमातून आरोग्यासाठी केलेल्या चांगल्या कामांना महाराष्ट्रात लागू करण्याच्या दृष्टीने विस्तृत अहवाल करण्याच्या सूचना सचिवांना दिल्या आहेत.    - राजेश टाेपे, आरोग्यमंत्री  

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरmedicineऔषधं