शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

शरद पवार यांच्यावर ८ ते १० दिवसांत आणखी एक शस्त्रक्रिया होणार: राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 2:38 PM

rajesh tope on ncp sharad pawar surgery: शरद पवार यांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

ठळक मुद्देराजेश टोपे यांनी दिली शरद पवार यांच्या शस्त्रक्रियेविषयी माहितीशरद पवार यांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल - टोपेडॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणे योग्य ठरेल, असे सुचवले आहे - टोपे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयाचा खडा शस्त्रक्रिया करुन काढला असून, शरद पवारांना होणाऱ्या वेदना थांबल्या सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (rajesh tope on ncp sharad pawar surgery)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून, पुढील चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल, अशी माहिती टोपे यांनी यावेळी बोलताना दिली. 

बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाइन पाहणार, आम्हालाही आमंत्रण नाही: अनिल परब

शरद पवारांवर पुन्हा एक शस्त्रक्रिया

शरद पवार यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शरद पवार यांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. तरीही डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणे योग्य ठरेल, असे सुचवले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, शरद पवार यांना सोमवारी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यावेळी बुधवारी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, अधिक त्रास जाणवू लागल्याने मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे शरद पवार यांचे सर्व नियोजित कार्यक्रम आणि दौरे रद्द करण्यात आले. पाच राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये निवडणुक प्रचार दौरा करणार होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajesh Topeराजेश टोपेMumbaiमुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस