Health Minister Rajesh Tope announces to start 8 labs for corona suspects checking in Maharashtra | राज्यात कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी नव्याने ८ लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी नव्याने ८ लॅब सुरु करणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

ठळक मुद्देराज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नकेंद्र सरकारकडून लॅबसाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्या

पुणे: राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४२ असून पुणे व पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ वर पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात नव्याने ८ लॅब लवकरच सुरु करण्यात येणार असून त्यातील तीन लॅब मुंबईतील कस्तुरबा, केईएम आणि पुण्यात बीजे मेडिकल येथे उद्यापासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी सांगितली. केंद्र सरकारकडून लॅबसाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे देखील स्पष्ट केले. 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या धर्तीवर राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्याकडून परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न सुरु आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्ये दिवसाला ४०० संशयितांचे अहवाल तपासले जात आहे. त्यात बीजे मेडिकल येथे सुरु करण्यात येणाऱ्या लॅबमध्ये १८० ते २०० तपासणी एकावेळी होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  हाफकीन ला मध्ये मदतीने 2 लॅब सुरू करणार आहे तपासणीसाठी लागणारे साहित्य केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहेत.
 क्वारन्टाईनमध्ये साधारण 830 लोक राहू शकतील इतकी जागा तयार करण्यात आली आहे. 100 रुग्णांसाठी नायडू वॉर्ड आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 60 बेडचा आयसोल्युशन वॉर्ड
 तयार करण्यात आला आहे.
 वर्क फ्रॉम होम ची अमलबजावणी लवकर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
पुण्यात 10 खासगी रुग्णलयात आयसोल्युशन वॉॅर्ड तयार करण्यात आले आहेत. 
पिंपरी मध्ये 8 खासगी रुग्णालयात आयसोल्युशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Minister Rajesh Tope announces to start 8 labs for corona suspects checking in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.