headache bjp and shiv sena | अयारामांना दिलेल्या शब्दामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार
अयारामांना दिलेल्या शब्दामुळे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढणार

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुक दोन महिन्यांवर येऊन ठेपली  आहेत. सत्तेत असलेल्या भाजप- शिवसनेशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. मात्र भाजपमध्ये येणारी इनकमिंग वाढतच आहे. इतर पक्षातील आजी-माजी आमदारांना उमेदवारी देण्याचा आश्वासने देऊन भाजप- शिवसेनेकडून फोडाफोडीचे राजकरण मोठ्याप्रमाणात सुरु आहे. तर दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्षात उमदेवारीची अपेक्षा लावून बसलेल्या जुन्या नेत्यांच्या नाराजीचा फटका भाजप-सेनेला विधानसभेत बसणार असल्याचे बोलले जात आहे.

देशात २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत भाजपने मोठे यश मिळवले. त्यांनतर भाजपमध्ये येणाऱ्यांच्या वेग वाढला. त्याचबरोबर सेनेने सुद्धा याच काळात अनेकांच्या हातात शिवबंधन बांधले. त्यातच आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीला मिळाले यश पाहाता, दोन्ही पक्षात इनकमिंग पुन्हा सुरु झाली. विशेष म्हणजे इतर पक्षातील विद्यमान आमदारांना फोडून आपल्या पक्षातून उमेदवारी देण्यावर युतीने भर दिला आहे. त्यामुळे इतर पक्षातून असंख्य विद्यमान आमदार, नेते, उमेदवार येतात आणि बघता बघता पक्षात आधीपासून काम करणाऱ्यांच्या पुढे निघून जात असल्याने सत्ताधारी  पक्षातील नाराजी वाढताना पहायला मिळत आहे. आणि हीच नाराजी विधानसभा निवडणुकीत उफाळून येण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसनेने आयात केलेल्या उमेदवारांना मंत्रिपद दिल्याने मराठवाड्यातील आमदारांची नाराजी समोर आली होती. त्यामुळे पक्षात आयात लोकांबद्दल नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच विधानभेत उमेदवारीची आश्वासने देऊन इतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना भाजप आणि शिवसेनेने आपल्या पक्षात घेतले आहे. त्यामुळे पक्षातील आधीच्या इच्छुकांची मनधरणी करताना युतीला विधानसभेत चांगलीच कसरत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.


Web Title: headache bjp and shiv sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.