"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 20:52 IST2025-10-26T20:51:46+5:302025-10-26T20:52:18+5:30
Sushma Andhare Criticize BJP: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपाला टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’, असं शीर्षक देऊन शेअर केलेल्या या पोस्टमधून सुषमा अंधारे यांनी भाजपाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले आहे.

"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्षांकडून भाजपा आणि मुरलीधर मोहोळ यांची कोंडी केली जात आहे. तर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट करत भाजपाला टोला लगावला आहे. ‘मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला’, असं शीर्षक देऊन शेअर केलेल्या या पोस्टमधून सुषमा अंधारे यांनी भाजपाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही डिवचले आहे.
या पोस्टमध्ये सुषमा अंधारे लिहितात की, ‘’मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला.सगळ्यात आधी विनोद तावडे, मग एकनाथ खडसे, मग पंकजा मुंडे, पाठोपाठ सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटलांनी तर कानाला खडा लावलाय. एकनाथ शिंदेंचा इस्तु इझलाय. गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतलीय. अब...अब तेरा क्या होगा मुरली ?’’, असा प्रश्न विचारत सुषमा अंधारे यांनी भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांचा बचाव केला आहे. रवींद्र धंगेकर हे लढणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली त्या आधारावर ते बोलले. मात्र हा विषय आता संपवा आणि महायुती जपा, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे आता हा वाद संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.