“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:37 PM2024-05-27T13:37:46+5:302024-05-27T13:38:25+5:30

Hasan Mushrif News: या लोकसभेत पराभव होणार, हे माहिती असणार असल्याने रवींद्र धंगेकर स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली.

hasan mushrif said ravindra dhangekar should apologized otherwise will case on him for defamation | “रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?

“रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, नाहीतर मानहानीचा दावा करणार”: हसन मुश्रीफ, पण प्रकरण काय?

Hasan Mushrif News: पुणे शहर गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली. यावेळी बाळाचे रक्ताचे नमुने कचरा पेटीत टाकले अन् दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. यातच रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यामधील अनधिकृत पबवर कारवाई सुरू असतानाच पब संस्कृतीविरोधात आवाज उठवणारे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे पुण्यातील एक्साईज कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससूमधील २ डॉक्टर काम करत होते, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला. या आरोपावर प्रतिक्रिया देताना हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला.

माफी मागितली नाही, तर बदनामीचा दावा

रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तपासणीत सांगितले आहे की, डॉ. तावरे यांच्या सागंण्यावरून बदलण्यात आले आहे. चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केलाय त्याची माहिती घेऊ. प्रसंगी त्यांना बडतर्फ करू. रवींद्र धंगेकर पुण्याचे आमदार आहेत, त्यांना स्टंट करण्याची सवय लागली आहे. दोन दिवसांच्या आत त्यांनी माफी मागितली नाही, तर बदनामीचा दावा दाखल करेन, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, ११ ते २४ मे दरम्यान मी परदेशी दौऱ्यावर होतो. ही घटना घडली तेव्हा मी येथे नव्हतो. वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर ससूनमध्ये ही तिसरी घटना घडली. ललित प्रकरणात ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आले. एकाला निलंबित करण्यात आले. येणाऱ्या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे हे माहिती असणार असल्याने ते स्टंटबाजी करत आहेत, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली.
 

Web Title: hasan mushrif said ravindra dhangekar should apologized otherwise will case on him for defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.