संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:34 IST2025-10-01T19:34:03+5:302025-10-01T19:34:41+5:30
harshwardhan sapkal: काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा सध्या सुरू आहे. ही पदयात्रा आज वर्धा जिल्ह्यात पोहोचली. या पदयात्रेदरम्यान, पोलिसांकडून सातत्याने पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा सध्या सुरू आहे. ही पदयात्रा आज वर्धा जिल्ह्यात पोहोचली. या पदयात्रेदरम्यान, पोलिसांकडून सातत्याने पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तसेच माझ्यावर जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करा असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान सातत्याने पोलिसांकरवी पाळत ठेवण्यात येत असून माझी हेरगिरी सुरू आहे ! कुठे असतो ? कुठे बसतो ? कुठे राहतो ? किती लोक पदयात्रेत आहेत ? कोण कोण सहभागी आहे ? या गोष्टीपासून तर थेट काय-काय बोलतो ? अशा प्रत्येक क्षणाचे रेकॉर्डिंग करण्यात येत आहे. अगदी मीडिया बाईट सुरू असताना पासून ते थेट जेवणाच्या पंगतींपर्यंत. याचा अर्थ काय?, असा सवाल सपकाळ यांनी विचारला.
आम्ही गांधीवाले आहोत निश्चितच घाबरणार नाही हे ते जाणून आहेतच ! मात्र एकंदरित अर्थ काय तर "ये सरकार हमसे डरती है' पुलिसको आगे करती है" माझे सरकारला खुले आव्हान आहे. माझ्यावर जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करा, असे आव्हानही त्यांनी या ट्विटमधून दिले आहे.