शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन जाधव यांच्यावर ४० गुन्हे

By admin | Updated: December 19, 2014 00:53 IST

विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षक पराग गुलाबराव जाधव यांना बुधवारी मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी १२ वेळा

चार ठाण्यात १२ तक्रारी : खुनाचा प्रयत्न आणि अपहरणाचेही कलमनरेश डोंगरे - नागपूर विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षक पराग गुलाबराव जाधव यांना बुधवारी मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर औरंगाबाद जिल्ह्यात यापूर्वी १२ वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना आ. जाधव यांनी बुधवारी सायंकाळी ६ वाजता कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर सोनेगाव पोलीस ठाण्यात आ. जाधव यांच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२ आणि ३२३ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आ. जाधव यांचा बुधवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत ठिकठिकाणी शोध घेतला. मात्र, जाधव पोलिसांना मिळाले नाही. त्यांना कोर्टाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम थांबवली.पराग जाधव ‘रिझर्व्ह’आमदाराच्या रोषाला बळी पडल्यामुळे चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक पराग जाधव यांची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे आज त्यांना रिझर्व्ह ठेवण्यात आले. त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न देता त्यांना औषधोपचार, पोलीस ठाण्यात बयान नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते उपलब्ध झाले नाही. पोलिसांचे मिशन जाधव शहर पोलिसांच्या एका पथकाने आज दिवसभर आ. जाधव यांच्यावर कुठे आणि किती गुन्हे दाखल आहेत, त्याची माहिती मिळवली. त्याचा एक अहवाल पोलिसांनी तयार केला. या अहवालाची प्रत प्रस्तुत प्रतिनिधीने प्राप्त केली.त्यानुसार, अ.क्र. (अपराध क्रमांक) ९२/०३ ला पोलीस स्टेशन पिशोर (औरंगाबाद) येथे कलम ३५३, ५०४ आणि ५०६ अन्वये पोलिसांनी गुन्हे दाखल केले. याच पोलीस ठाण्यात आ. जाधव यांच्याविरुद्ध नंतर वेगवेगळ्या अ.क्र.नुसार विविध कलमान्वये सातवेळा गुन्हे दाखल झाले. कन्नड (औरंगाबाद) पोलीस ठाण्यात अ.क्र. ४१/०५ अन्वये भादंविच्या कलम १७१ अन्वये गुन्हा दाखल आहे. खुलताबाद (औरंगाबाद) ठाण्यात अ.क्र. २/११ अन्वये खुनाचा प्रयत्न, अपहरण, सरकारी कामात अडथळा, विनयभंग आणि धमकी देण्याच्या आरोपावरून आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हे (भादंवि कलम ३०७, ३६३, ३५३, ३५४, ५०६) दाखल केले. देवगाव रंगारी (औरंगाबाद) पोलीस ठाण्यातही आ. जाधव यांच्याविरुद्ध अ.क्र. ०४/०९ नुसार कलम ३५३, १४७, ४२७ भादंवि अन्वये गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)