शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

डेंगीसह साथीच्या रोगांमुळे हैराण

By admin | Updated: August 25, 2016 01:51 IST

शहरात डेंगीसह साथीच्या रोगांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दौंड : शहरात डेंगीसह साथीच्या रोगांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. साधारणत: डेंगीसह अन्य साथीचे सुमारे ५० च्यावर रुग्ण उपचार घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे आरोग्य पथकाच्या सर्वेक्षणानुसार गेल्या महिन्यात विषाणूजन्य आजाराचे ३० च्या जवळपास रुग्ण होते. मात्र आता रुग्णांची संख्या पूर्णपणे घटली असून डेंगी या आजाराचे निदान मात्र अद्याप झाले नसल्याचे आरोग्य पथकाच्या डॉ. मीना भट्टड यांनी सांगितले. गेल्या महिन्यात हवामानात अचानक बदल झाला. त्यातच शहरातील काही भागांत घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथींच्या रोगांचा फैलाव होत चालला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात विविध साथींच्या रुग्णांसह डेंगीचे रुग्ण उपचार घेत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासनपातळीवर योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असले तरी नागरिकांनीदेखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, असे नागरिकांनी सांगितले. दौंड नगर परिषद, प्राथमिक आरोग्य पथक, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य कर्मचारी आणि सुश्रुषा नर्सिंग स्कूल, सुशीला नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात साथीच्या रोगांवरील उपाययोजना म्हणून कामकाज केले जात आहे. (वार्ताहर)>अद्याप निर्वाळा नाही : तरच ठामपणे सांगता येईलआरोग्य पथकाच्या प्रमुख डॉ. मीना भट्टड म्हणाल्या, ‘‘२० दिवसांपासून शहरात स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले जात आहे. साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर धुराळणी, फवारणी करण्यात येत आहे. डेंगीचे रुग्ण असल्याचा अद्याप निर्वाळा मिळालेला नाही. रुग्णांची तपासणी करून ती वरिष्ठांकडे पाठवली आहे. त्याचा अहवाल येताच रुग्ण आहेत की नाही, हे ठामपणे सांगता येईल. तरीदेखील साथीच्या रुग्णांचे प्रमाण कमी होत चालली आहे.>डेंगीवर उपाययोजना करावीदौंड : शहरात डेंगीच्या साथीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत असल्यामुळे यावर उपाय योजना वेळीच करावी, असे निवेदन दौंड भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांना देण्यात आले आहे. शहरातील डेंगीच्या साथीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याला आळा घालण्यासाठी आपण योग्य ती उपाय योजना करावी; अन्यथा होणारे डेंगीचे आजार यातून होणाऱ्या घाणीचा परिणाम हा दौंड शहरवासीयांना भोगावा लागेल. डेंगीची शक्यता नाकारता येत नाहीदौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात म्हणाले, की शहरात डेंगीचे रुग्ण असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील शहरातील काही भागांमध्ये धुराळणी, फवारणी करण्यात आलेली आहे. दरम्यान, साथीचे रोग कमी होत चालले आहेत.