शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठूर पोलीस हवालदार गजाआड

By admin | Updated: February 20, 2017 17:30 IST

पोलीस हवालदार अरविंद लालबच्चन पांडे (वय ५४) याच्यावर अखेर गिट्टीखदान पोलिसांनी पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 20 - पोलीस हवालदार अरविंद लालबच्चन पांडे (वय ५४) याच्यावर अखेर गिट्टीखदान पोलिसांनी पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला रविवारी रात्री अटक केली. सुनीता अरविंद पांडे (वय ५०) असे त्याच्या मृत पत्नीचे नाव असून, १६ फेब्रुवारीला पोलीस क्वॉर्टरमध्ये तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. लोकमतने हे प्रकरण लावून धरतानाच पांडेचा निष्ठूरपणाही अधोरेखित केला होता, हे विशेष!

सुनीताचे २० वर्षांपुर्वी (१९९७) अरविंद पांडेसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या काही वर्षांनंतर ती वारंवार आजारी पडू लागली. त्यानंतर ती मनोरुग्ण बनली. या स्थितीत ती घराबाहेर निघून जात होती. हवलदार पांडे तिच्यावर औषधोपचार करण्याऐवजी तिला क्रूरपणे घरात डांबून ठेवू लागला. गेल्या वर्षी सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी त्याचा हा निष्ठूरपणा उघड केला. त्यानंतरही त्याने तिला रुग्णालयात पाठविण्याऐवजी घरातच डांबून ठेवणे सुरू केले. हे करताना तो पाच-पाच दिवस घराकडे फिरकत नव्हता. आठवड्यातून एखादवेळा यायचा. दुसरीकडे खायचा अन् दुसरीकडेच राहायचा. दोन आठवड्यापुर्वी पांडेने तिला घरात डांबले अन् निघून गेला. घरात खायला अन्न नव्हते आणि दाराला बाहेरून कुलूप लावून असल्यामुळे घराबाहेर जाऊन दुस-या कुणाला मागायची सोय नव्हती. त्यामुळे सुनीता बिचारी बंद दाराच्या आड आपल्या वेदना पोटात गिळून मूक आक्रंदन करू लागली. अन्नाचा दाना पोटात नसताना तििच्या पोटातील अल्सर फुटला. त्यामुळे असहाय सुनीता तडफडत मेली. तिचा मृतदेह कुजला. दुर्गंध सुटल्यामुळे गुरुवारी दुपारी पोलीस उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी गिट्टीखदान ठाण्यात माहिती कळविली. गिट्टीखदान पोलीस पांडेच्या घरी पोहोचले. तेथे सुनीता पांडे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तो मेयोत पाठविला.वैद्यकीय अहवालातून खुलासा-सुनीताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय अहवाल देताना ह्यसुनीता अनेक दिवसांपासून उपाशी होती अन् तिच्या पोटात अल्सर फुटल्यामुळे तिचा मृत्यू झालाह्ण, असे नमूद केले. शासकीय निवासस्थान असूनदेखिल तेथे लाईट न लावता पांडे पत्नी सुनीताला अंधारात घरात डांबून ठेवत होता. तिच्या औषधोपचार आणि खाण्यापिण्याची व्यवस्था न केल्यामुळेच तिचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला पांडेचा निष्ठूरपणा कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी आरोपी पोलीस हवालदार अरविंद पांडे याच्याविरुद्ध कलम ३०४, ३४२ आणि ३४४ अन्वये गुन्हा दाखल केला. त्याला रविवारी रात्री अटक करण्यात आली.