शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘हरिजनवाडा’चे होणार विद्यामंदिर क्रांतिनगर

By admin | Updated: March 12, 2015 00:37 IST

‘लोकमत’चा पाठपुरावा : शिक्षण समितीत मंजुरी; नामांतराचा प्रस्ताव

कोल्हापूर : जिल्ह्णातील शित्तूर वारुण (ता. शाहूवाडी) येथे असलेल्या शाळेचे ‘विद्यामंदिर हरिजनवाडा’ असे नाव असल्याचे ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर शिक्षण प्रशासन ‘जागे’ होऊन नामांतरासाठी धावपळ करीत आहे. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीने ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करण्याचा दिलेला प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर झाला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार आहे. स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विद्यामंदिराला ‘हरिजनवाडा’ असे नाव राजर्षी शाहू महाराजांच्या विचार, वारसा, इतिहास असलेल्या जिल्ह्यात असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले. त्यानंतर विविध दलित संघटनांनी नामांतराची मागणी लावून धरली आहे. अजूनपर्यंत नामांतर न केल्याबद्दल शिक्षण प्रशासनावर जोरदार टीका झाली.त्या शाळेला ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिर’ असे नाव द्यावे, अशी मागणी ‘भारिप बहुजन महासंघा’ने केली. याउलट युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनने ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ असे नामकरण करावे, अशी मागणी केली. त्यामुळे शाळेला कोणते नाव दिले जाते, याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.‘लोकमत’चा पाठपुरावा आणि संघटनांचा दबाव यामुळे शिक्षण प्रशासनालाही नाव बदलण्याची बुद्धी सुचली आहे. शिक्षण प्रशासनाने नियमानुसार नामांतराचा प्रस्ताव मागून घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला. बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ‘स्थायी’मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळाल्यास नामांतरावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, गेल्या सर्वसाधारण सभेत शाळेचे नामांतर करण्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर सर्व सदस्यांनी नामांतरास मंजुरी दिली. असे असताना पुन्हा सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अशा प्रकारे केवळ कागदी घोडे नाचवीत नामांतरास विलंब होत असल्याचा आरोप काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)विविध संघटनांनी वेगवेगळी नावे देण्याची मागणी केली तरी स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीकडून ‘विद्यामंदिर क्रांतिनगर’ असे नामकरण करावे, असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला आज, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर नामांतराचा आदेश दिला जाईल.- स्मिता गौड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)