शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मुलीच्या खुन्याची फाशी रद्द

By admin | Updated: February 22, 2015 01:57 IST

सत्र न्यायालयाने ठोेठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली असून, त्याऐवजी त्यास ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा चार वर्षांपूर्वी शिरच्छेद करणाऱ्या नालासोपारा (पू.) येथील चंद्रकांत वसंत आयरे या ३८ वर्षीय नराधमास सत्र न्यायालयाने ठोेठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलात रद्द केली असून, त्याऐवजी त्यास ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला आहे.नालासोपारा येथील हेमंत पाटील चाळीत राहणाऱ्या चंद्रकांतने २८ जून २०११ रोजी पत्नी संचिता आणि मुलगी वैष्णवी यांची शिरे धारधार चाकूने धडावेगळी केल्यानंतर स्वत:वरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. चाळीतील इतर लोकांनी दार उघडायला लावेपर्यंत चंद्रकांत या दोघींची रक्तबंबाळ प्रेते चटईवर मांडून ठेवून बाजूला बसून राहिला होता.अपिलात न्या. विद्यासागर कानडे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देताना त्यास किमान ३० वर्षे तुरुंगातून न सोडण्याचा आदेश दिला.न्यायमूर्तींनी म्हटले की, चंद्रकांतने केलेले खून निर्घृण नक्कीच आहेत. पण ज्यासाठी फक्त फाशीच दिली जाऊ शकते, अशा विरळात विरळा या वर्गात ते मोडणारे नाहीत. चंद्रकांतला पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता व तिच्यासह मुलीचाही खून केल्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून त्याचे मानसिक संतुलन ढळले होते असे दिसते. त्यामुळे हे खून त्याने पूर्व नियोजनाने केले, असेही म्हणता येत नाही. या प्रकरणातील तथ्ये पाहता आरोपीला फाशी देणे न्यायाचे होणार नाही तसेच त्याला निव्वळ जन्मठेप ठोठावूनही न्याय होणार नाही. (विशेष प्रतिनिधी)या खटल्यात पत्नी व मुलीचे खून चंद्रकांत यानेच केले याला कोणताही थेट पुरावा नव्हता की कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र दोन्ही प्रेते व कापलेली मुंडकी चटईवर ठेवून त्यांने घर बंद करून आत बसून राहणे, इतर कोणी घरात घुसून खून केले असतील तर अजिबात आरडाओरड न करणे, घरात त्या वेळी आणखी कोणी नसताना खून कसे झाले याचे स्वत: कोणतेही स्पष्टीकरण न देणे आणि आपल्या स्वत:लाही प्राणघातक जखमा कशा झाल्या, याविषयी मूग गिळून गप्प बसणे या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून हे दोन्ही खून चंद्रकांत यानेच केले, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.