निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र; राज्य सरकारचे वाचले ७० काेटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 08:26 IST2024-12-13T08:26:43+5:302024-12-13T08:26:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पोटी ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ४ ...

निम्मे कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र; राज्य सरकारचे वाचले ७० काेटी रुपये
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई पोटी ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ४ लाख अर्जांद्वारे कांद्याचा विमा काढला होता. त्यापैकी पावणे दोन लाख अर्ज पडताळणीत अपात्र ठरले. यातून तब्बल ९६ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा बनावट असल्याचे आढळले आहे. बनावट अर्ज अपात्र ठरविल्याने सरकारचे ७० कोटी रुपये वाचले आहेत.
पथकांकडून पडताळणी
nनाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, संभाजीनगर व बीड या जिल्ह्यांमध्ये बनावट विम्याच्या संशयानंतर १० पथकांनी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.
nया आठ जिल्ह्यांमध्ये ४ लाख २ हजार ३९८ अर्जदारांनी २ लाख ६४ हजार २४८ हेक्टरवरील कांद्याचा विमा काढला. सर्वाधिक १ लाख २३ हजार ९५३ अर्जधारकांनी ८५,६६५ हेक्टर विमा एकट्या सोलापूर जिल्ह्यात काढला होता. तर नाशिक जिल्ह्यात ८१,६२३ अर्जदारांनी ४८,३९४ हेक्टरवर विमा काढला होता.
बीड जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अपात्र अर्जांची संख्या एकूण अर्जांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.
- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे