शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: May 29, 2015 01:22 IST

गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत.

मुंबई : गेल्या सहा महिन्याच्या काळात राज्यात १५०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी २९९ आत्महत्यांची कारणे अद्याप भाजपा-शिवसेना सरकारला शोधता आलेली नाहीत. शिवाय, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचे १८२७.६२ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत, गारपीट आणि वादळाने झालेल्या नुकसानीची मदत तर अजून कागदावरच आहे, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.खरीपाच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ३० मे ते १ जून असे तीन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहितीही मुंडे यांनी दिली. मुंडे म्हणाले, सरकारकडे ४८०३.०९ कोटींची मागणी २६ जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. प्रत्यक्षात फक्त ३४३५.७३ कोटींची मदत दिली गेली. उर्वरित १८७२.६२ कोटी दिलेले नाहीत. एकीकडे जन धन योजनेत प्रत्येकाचे बँक खाते आहे असा डांगोरा पिटणाऱ्या युती सरकारने शेतकऱ्यांची खाती सापडत नाहीत म्हणून ४६० कोटी रुपये दिलेले नाहीत, असेही मुंडे म्हणाले.१५०४ आत्महत्यांपैकी अमरावती विभागात ५८५, मराठवाड्यात ५३२, नाशिक विभागात १९९, नागपूर विभागात १६२, तर कोकणात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीही सांगितली. आत्महत्येनंतर ४८ तासात जिल्हास्तरीय समितीसमोर प्रकरण ठेवून सानुग्रह अनुदान मंजूर करण्याची कारवाई करण्याच्या सूचना असताना अद्यात २९९ आत्महत्यांचा अहवालच आलेला नाही असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.च्दुष्काळी परिस्थिती तीव्र असताना राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून विमा कंपनीला २५० कोटी रुपये प्रिमीयम भरला मात्र सरकारने स्वत:च्या हिश्श्याचे ६३० कोटी रुपयांसाठी अर्थसंकल्पात तरतूदच केलेली नव्हती. च्काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत आकस्मिकता निधीतून ही रक्कम देण्याची तरतूद केली गेली आहे. त्यामुळे ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना काहीही मदत मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.