शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्र्यांचा पाणउतारा

By admin | Updated: September 17, 2016 03:39 IST

कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले

मोखाडा : कुपोषण व सरकारी अनास्थेचा बळी ठरलेल्या सागर वाघच्या घरी तब्बल १५ दिवसांनतर सांत्वनासाठी गेलेल्या पालकमंत्री विष्णू सवरा यांना त्याच्या कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आले का फोटो काढायला!’ असा संतप्त सवाल सागरच्या आई व आजीने विचारून मंत्रीमहोदयांचा अक्षरश: पाणउतारा केला. दारातच असा पाणउतारा झाल्याने मंत्रीमहोदयांना आपल्या ताफ्यासह माघारी परतावे लागले.
३० आॅगस्ट रोजी सागरचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. हा प्रकार आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघात होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटूनही कुपोषणबळी कुटुंबाकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याने सर्वत्र टीकेची झोड उठली होती. गुरुवारी सकाळी उशिरा पालकमंत्र्यांनी खोचगावातील पीडित कुटुंबीयांना भेट दिली. परंतु, या वेळी पालकमंत्र्यांना मृत सागरच्या आई व आजीने दारातच अडवले व जाब विचारला. यामुळे ताफ्यासह आलेल्या पालकमंत्र्यांना दारातूनच माघारी परतावे लागले. यानंतर, पालकमंत्र्यांनी खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणबळी कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर, मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला भेट न देता जव्हारकडे रवाना झाले.
सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेल्या बालसंजीवन छावणीमध्ये उपचार घेत होता. सरकारने व्हीसीडीसी ही कुपोषण निर्मूलन व सकस आहार देणारी योजना सुरू केल्याची घोषणा केली आणि सागरचे पालक त्याला घरी घेऊन आले. मात्र, सरकारची योजना कागदावरच राहिली आणि त्यानंतर उपचाराअभावी सागरचा मृत्यू झाला.

पालकमंत्र्यांच्या उशिरा हजेरीमुळे श्रमजीवीचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा, गणेश माली यांनी काळ्या फिती लावून पालकमंत्र्यांचा निषेध केला. या वेळी गेल्या वर्षभरात ६०० बालके कुपोषणाने मरण पावली आहेत. आपण काय केले, असा सवाल विचारताच पालकमंत्र्यांचा तोल गेला. सवरा म्हणाले, ‘मेली, मग काय झाले, असू देत ना, बघू आम्ही करू काय ते’ अशी मुक्ताफळे उधळली.

गावात एकाही मंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही
आता आम्ही सगळ्यांनी मिळून निर्धार केला की, आता आदिवासींची थट्टा पुरे. नुसते दौरे अन् भेटी नको. जोपर्यंत पालघर जिल्ह्यातील बालविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, शून्य ते ६ वयोगटांतील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला गरोदर काळापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही, तोपर्यंत गावात एकाही मंत्र्याला पाय ठेवू देणार नाही.
- पांडू मालक,
सरपंच, खोच ग्रामपंचायत