शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 17:57 IST

Gunratna Sadavarte : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: दिली आहे. 

Gunratna Sadavarte : मुंबई : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यादृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक यांनी तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. अशातच आपल्या आक्रमक बोलण्याच्या स्टाईलने कायमच चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वत: दिली आहे. 

वरळी विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. तसेच आगामी निवडणूकही आदित्य ठाकरे वरळीतून लढणार आहेत. अशातच आता गुणरत्न सदावर्ते यांनीही आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. तसेच, महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.     

वरळी विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. आता आगामी निवडणुकीत सुद्धा वरळीतून आदित्य ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर मनसेकडून संदीप देशपांडे सुद्धा वरळीतून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, महायुतीत या मतदारसंघात शिवसेना लढणार का भाजप? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाची आगामी निवडणूक हाय व्होल्टेज होणार, हे मात्र निश्चित आहे.

गुणरत्न सदावर्ते हिंदी बिग बॉसमध्ये करणार एन्ट्री! लवकरच बिग बॉस हिंदीच्या १८ व्या पर्वात सहभागी होणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः सांगितले आहे. ‘आगे आगे देखो होता है क्या…’, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे तर आम्ही काळजी करत नाही लोक आम्हाला घाबरतात. तर लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची लढाई आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांचे म्हणणे आहे. तसेच, हमारा नाम काफी है, म्हणत लोक आम्हाला घाबरतात आम्ही तर डंके की चोटपर बोलतो. म्हणून आम्ही कोणाची काळजी करत नाही तर लोक आमची काळजी करतात, असे ते म्हणाले.

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेAditya Thackreyआदित्य ठाकरेworli-acवरळीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण