शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कारंजातील गुरूमंदिराच्या देणगीत ३६ कोटींचा अपहार

By admin | Updated: June 1, 2015 02:08 IST

विश्‍वस्तांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल.

कारंजा (वाशिम): लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या देणगीत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याचा प्रकार रविवारी उजेडात आला. जवळपास ३६ कोटी रूपयांचा हा अपहार असून, याप्रकरणी कारंजा पोलिसांनी मंदिराच्या विश्‍वस्तांसह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने गुरूभक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. कारंजा येथील शेखर पुरूषोत्तम काण्णव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्‍वस्तांनी सन २000 ते २00१ आणि २0१0 ते २0११ या काळात संगनमत करून संस्थानला देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांचा बनावट अहवाल तयार केल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात बनावट दस्तऐवज दाखल करून ३६ कोटी ३७ लाख ७९ हजार ८३३ रूपयांची अफरातफर केल्याचा दावाही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या तक्रारीनुसार कारंजा शहर पोलिसांनी विश्‍वस्त नारायण गणपत खेडकर (८0), वसंत महादेव सस्तकर (७७), उमाकांत पुरूषोत्तम पांडे (७0), दिगांबर राजाराम बर्डे (८0), विनायक दिगांबर सोनटक्के (६५), श्रीपाद यशवंत परळीकर आणि प्रकाश वसंत घुडे (सर्व रा.कारंजा), संस्थानचे लेखा परिक्षक सुभाष विनायक मुंगे तसेच अमरावती येथील लेखा परिक्षक संजय एस.खांडेकर यांच्याविरूद्ध कलम ४२0, ४६५, ४६८, ४0८, ४७0 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, मंदिराच्या व्यवहारासंदर्भात काण्णव यांनी यापूवीर्ही तक्रार केली होती. ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे यासंदर्भात मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया गुरुमंदीर संस्थानच्या विश्‍वस्तांनी व्यक्त केली.