शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

हे पाहुणे सरकार; ते फार काळ टिकणार नाही! नारायण राणेंचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 14:45 IST

नारायण राणे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारविरोधात डागली टीकेची तोफ

कणकवली/मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाविकास आघाडी सरकारवर भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यात सत्तेवर आलेले तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फार काळ टिकणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आयोजित पत्रकार परिषदेमधून नव्या सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले सरकार हे पाहुणे सरकार आहे, ते फारकाळ टिकणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केवळ स्वार्थापोटी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आहे,'' असे नारायण राणे म्हणाले. यावेळी गेल्या काही दिवसांत सरकारने विविध विकासकामांना दिलेल्या स्थगितीवरूनही  नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली. ''सरकारकडून विविध विकासकामांना स्थगिती दिली जात आहे. सत्ता बदलल्यानंतर कोकणातील विविध विकासकामे ही ठप्प झाली आहेत. त्यामुळे या सरकारचे स्थगिती सरकार असे नामकरण करता येईल,'' असा टोला राणेंनी लगावला. जिल्ह्यात आढावा बैठका घेणार खासदार विनायक राऊत यांच्यावरही राणेंनी जोरदार टीका केली. शिवसेना आता सत्तेत नाही. त्यामुळे विनायक राऊत यांनी कोणत्या अधिकारांमध्ये जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. सत्तारुढ पक्षाचे खासदार नसताना त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकारात आदेश दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच बेकायदेशीर बैठका घेऊन शिवसेनेकडून काम करत असल्याचा भास निर्माण केला जात आहे, असेही राणे म्हणाले. ''राज्यात तीन पक्षांना एकत्र येत स्थापन केलेले सरकार हे कसे उपयुक्त नाही याची माहिती आम्ही जनतेला देणार आहोत. त्यासाठी 15 ते 18 डिसेंबरदरम्यान गाव बैठका घेणार आहोत, असेही राणेंनी सांगितले. तसेच क वर्ग देवस्थांना मिळणाऱ्या निधीला स्थगिती देण्याचा निर्णयाला आम्ही विरोध करू, तसेच विकासाबाबतचा अन्यायही सहन करून घेणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019