शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
4
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
5
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
6
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
7
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
8
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
9
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
10
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
11
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
12
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
13
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
14
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
15
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
16
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
17
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
18
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
19
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
20
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले

ग्रा.पं.सदस्य, नगरसेवकांना स्वतंत्र विकास निधी हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 13:15 IST

आमदार, खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांनाही स्वतंत्र वॉर्ड विकास निधी देण्यात यावा यासह सहा राष्ट्रीय मागण्यांसाठी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली येत्या 17 नोव्हेंबरपासून देशात एका नव्या राष्ट्रीय चळवळीला सुरुवात होत आहे

आमदार, खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांनाही स्वतंत्र वॉर्ड विकास निधी देण्यात यावा यासह सहा राष्ट्रीय मागण्यांसाठी प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली येत्या 17 नोव्हेंबरपासून देशात एका नव्या राष्ट्रीय चळवळीला सुरुवात होत आहे. यासंदर्भात त्यांचे एक पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. यानिमित्ताने अरुण लिगाडे यांनी प्रफुल्ल कदम यांची घेतलेली मुलाखत... 

तुमच्या राष्ट्रीय  मागण्या काय आहेत ?आमदार, खासदारांप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका व महानगरपालिका नगरसेवक यांना त्यांच्या प्रत्येक वाॅर्डासाठी दरवर्षी स्वतंत्र वाॅर्ड विकास निधी देण्यात यावा; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आमदार निवडण्याचा अधिकार ग्रामपंचायत सदस्यांनाही देण्यात यावा. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य व नगरसेवक यांचेही स्वतंत्र आमदार निवडण्यात यावेत. निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झालेल्या (विजयी उमेदवारांच्या तुलनेत ५० टक्के मतदान घेऊन) पराभूत उमेदवारालाही किमान ५० टक्के विकासनिधी देण्यात यावा.

या मागण्या मान्य झाल्यास आपल्या देशातील गावांना आणि शहरांना काय फायदा होईल?या सहा मागण्या मान्य झाल्या तर देशातील २ लाख ५५ हजार ३६६ ग्रामपंचायती, ३,७४१ नगरपालिका आणि २५१ महानगरपालिका यांचा चेहरामोहरा बदलून जाईल. लोकशाहीचे खऱ्या अर्थाने विकेंद्रीकरण होईल, महिलांना व आरक्षण असणाऱ्या घटकांना पहिल्यांदाच एवढी मोठी संधी मिळेल. स्थानिक लोकांना रोजगार, सन्मान आणि अधिकार मिळेल. स्थानिक उपक्रमशीलतेला वाव मिळेल. गावांमध्ये आणि शहरांमध्ये अगदी कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती घडेल.

या मागण्या मान्य झाल्या तर आमदार- खासदारांचे महत्त्व कमी होईल का ?नाही. उलट त्यांच्यावरील विकासाचा भार हलका होईल. आज देशातील बहुतांश आमदार, खासदारांचा वेळ व शक्ती अवैधानिक कामांमध्ये नाहक खर्च पडत आहे. त्यामुळे देशाचे खूप मोठे नुकसान होत आहे. या मागण्या मान्य झाल्यावर त्यांना प्रादेशिक व राष्ट्रीय प्रश्नामध्ये अधिक लक्ष देता येईल. स्थानिक पातळीवर कामे सुरू झाल्यावर स्पर्धात्मक वातावरणामुळे वैधानिक कामाचा दर्जाही आपोआप सुधारेल.

नव्या शासनाने सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल तुमची भूमिका काय असणार?सरपंचाची निवड थेट जनतेतून करणे हा पूर्णपणे वेगळा विषय आहे; परंतु हा निर्णय घेताना विधिमंडळात सत्तारुढ आणि विरोधक या दोन्ही गटातील आमदारांनी ग्रामपंचायत सदस्यांचे लोकशाहीतील स्थान व महत्त्व आणि वॉर्डाचे राज्यघटनेतील  स्थान हे दोन पायाभूत मुद्देच विचारात घेतलेले नाहीत. ही अत्यंत गंभीर व बेजबाबदार बाब आहे.

तुमच्या चळवळीची पुढीलदिशा काय असणार आहे ?सहा मागण्यांसाठी १७ नोव्हेंबरपासून देशातील पहिली आणि सर्वात मोठी फोन चळवळ सुरू करीत आहोत. यामध्ये आम्ही मागण्या मान्य होईपर्यंत दररोज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना फोन करून फक्त एकच प्रश्न विचारणार आहोत की आमच्या सहा मागण्या कधी मान्य करणार? पहिल्या टप्प्यात आम्ही १० हजार ग्रामपंचायतीच्या ठरावांसह १ लाख सदस्यांचा पाठिंबा शासनाला सादर करणार आहाेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत