राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 10:30 AM2019-11-10T10:30:22+5:302019-11-10T10:36:02+5:30

राज्यात सरकार स्थापनेवरून  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे.

Governors have given opportunity to BJP, take advantage of it - Sanjay Raut | राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला

राज्यपालांनी भाजपाला संधी दिलीय, त्याचा लाभ घ्यावा; संजय राऊत यांचा टोला

Next

मुंबई - राज्यात सरकार स्थापनेवरून  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. राज्यपालांच्या पुढाकारानेच आता राज्याला नवे सरकार मिळू शकते. राज्यपालांनी भाजपाला संधी दिली आहे, त्यांनी याला लाभ घेतला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाने बहुमत सिद्ध करून दाखवावं, असे आव्हानही राऊत यांनी दिले आहे. 

 विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राज्यात नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, राज्यपालांनी भाजपाला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ''एकंदरीत परिस्थिती पाहता आता राज्यपालांच्या पुढाकारानेच राज्याला सरकार मिळू शकते. त्यांनी भाजपाला संधी दिली आहे. आता भाजपाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे. खरंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाने यापूर्वीच सरकारस्थापनेसाठी दावा केला पाहिजे होता.''

राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापनेची तयारी आहे की नाही याबाबत 11 तारखेला रात्री 8  वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपाने यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी दावा केलेला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच गेल्या 15 दिवसांत भाजपाने सरकार स्थापनेचा दावा काले काला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज दुपारी 12.30 मालाडमधील रिट्रीट हॉटेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. 

 

Web Title: Governors have given opportunity to BJP, take advantage of it - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.