शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांना झाली घाई!

By admin | Updated: September 29, 2014 07:49 IST

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले

मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भाजपा आणि शिवसेनेला हंगामी सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना राज्यपालांना एवढी घाई का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला होता. त्याआधीच राज्यातील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली होती. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला जेमतेम १५-२० दिवस उरले असल्याच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू सरकारकडे कारभाराची जबाबदारी सोपविली जाईल, अशी अटकळ राज्यपालांनी चुकीची ठरविली. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होण्यापूर्वी राज्यपालांनी भाजपा आणि शिवसेनेला पत्र देऊन सरकार स्थापण्याचे आमंत्रण दिले होते. राज्यपालांनी असे पत्र दिल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मान्य केले आहे. या आमंत्रणामागे राजकीय हेतू होता की काय, याचीही चर्चा राजकीय गोटात चवीने सुरू आहे. (विशेष प्रतिनिधी)