शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा मोठा निर्णय! सनदी सेवेतील व सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश वाऱ्यांना आता चाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:20 IST

खासगी संस्थेतर्फे गेल्यास उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरकारच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांच्या आणि सरकारी परदेश वाऱ्यांना सरकारने चाप लावला आहे. परदेश दौऱ्यांचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील तसेच खासगी संस्थेचा दौरा असल्यास संबंधित संस्थेचे उत्पन्नाचे स्रोत सरकारला सादर करावे लागणार आहे.

राज्याच्या सेवेतील काही सनदी अधिकारी आणि सरकारी अधिकारी अभ्यासदौरा आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली वारंवार परदेश दौरे करत असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. परदेश दौऱ्याचे परिपूर्ण प्रस्ताव सरकारला सादर होत नाहीत. कागदपत्रांमध्ये त्रुटी असतात. अनेकदा विसंगती असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

आदेशात काय?

काही अधिकाऱ्यांची टीमच प्रशिक्षणाच्या नावावर परदेश दौऱ्यावर रवाना होते. हे लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केले असून अभ्यास दौरा आणि प्रशिक्षण वगळता अन्य दौऱ्यांमध्ये तीनपेक्षा जास्त अधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश करू नये, असेही गुरुवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

मान्यता बंधनकारक

  • अनेकदा सरकारी अधिकारी खासगी संस्थेच्या पैशाने परदेश दौरे करतात. त्यामुळे आता अशा संस्थांच्या उत्पन्नाचा स्रोत शोधण्यात येणार आहे. परदेश दौऱ्याचा खर्च खासगी संस्था करणार असल्यास संबंधित संस्थेचा प्रकार व उत्पन्नाचा स्रोत व खर्चाची अंदाजित रक्कम सरकारला सादर करावी लागणार आहे.
  • काही अधिकारी परस्पर स्वतःच्या 3 नावाने परदेश दौऱ्याची निमंत्रणे मिळवतात. त्यामुळे दौऱ्याचे निमंत्रण कोणामार्फत आले, निमंत्रण देणाऱ्या संस्थेचा तपशीलही राज्य सरकारला सादर करावा लागणार आहे.
  • काही सनदी अधिकारी मंत्र्यांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे आता सनदी अधिकाऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी मंत्र्यांची मान्यता घेणे बंधनकारक केले आहे.
टॅग्स :Governmentसरकार