शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्तिपीठ’ रद्दसाठी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 18:26 IST

बाधित शेतीत उद्या भगवा फडकवून शासनाचा निषेध: शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन करणार

सांगली : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या प्रमुख मागणीसाठी दि. २३ मार्च रोजी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी शहिदांना अभिवादन करून शक्तिपीठ महामार्ग बाधित क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा फडकवत ठेवणार आहे. तसेच शेतकऱ्यांचा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शासनाच्या धोरणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला शेतकरी फाशी देणार आहेत, असा इशाराही शेकापचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी दिला.शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची कवलापूर येथे बैठक झाली. या बैठकीनंतर दिगंबर कांबळे बोलत होते. कांबळे म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीने गेली वर्षभर अनेक आंदोलने केली आहेत. शासन दरबारी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांची थट्टा करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी पूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात येणार आहे, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग करणारच म्हणून चंग बांधला आहे. त्यामुळे आता जे काही आंदोलन करायचं ते शेतातच करायचं असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. रविवार, दि. २३ मार्च रोजी शासन विरोधी जोरदार घोषणा देऊन अतितीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा झेंडा लढण्याची ऊर्जा देते. जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत भगवा झेंडा शेतामध्येच फडकत राहणार आहे. जबरदस्तीने संयुक्त मोजणी करण्याचा शासनाकडून प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागेल.

यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार, जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे, उपाध्यक्ष राहुल जमदाडे, कार्याध्यक्ष भूषण गुरव, कोषाध्यक्ष विष्णू सावंत, हणमंत सावंत, बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ नेते गजानन पाटील, गजानन सावंत, शिवाजी शिंदे, नाथा माळी, जनार्दन सावंत, नागेश कोरे, वामन कदम, रत्नाकर वठारे, बाजीराव जाधव, सिद्धेश्वर जमदाडे व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाधित सर्वच जिल्ह्यांत आंदोलनशक्तिपीठ महामार्ग बाधीत राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आणि सांगली जिल्ह्यातील १९ गावांतील सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भगवा झेंडा लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीhighwayमहामार्गagitationआंदोलनFarmerशेतकरीGovernmentसरकारShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्ग