शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

'सरकार म्हणते बेटी बचाव, आमदार म्हणतात बेटी भगाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 23:33 IST

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला कार्यकर्ता मेळावा

कर्जत : गेल्या चार वर्षांमध्ये महागाई खूप वाढली आहे. यंदाची दिवाळी कशी करायची हा प्रश्न पडला आहे. पदव्या आहेत, मात्र मुलांना नोकऱ्या नाहीत. रेशनिंगची तऱ्हाच वेगळी आहे. मोदी म्हणतात, बेटी बचाव आणि त्यांचे आमदार म्हणतात बेटी भगाव, काय चाललेय हेच कळत नाही, अशी परखड टीका महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.महाराष्ट्र प्रदेश महिलाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या कोकण विभागातील संपर्क दौºयाच्या अनुषंगाने कर्जत व खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा मेळावा येथील यशदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर कर्जत-खालापूर मतदार संघ आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हिरा दुबे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा दीपिका चिपळूणकर, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा कमल विशे, राजिप शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, राजिप महिला व बालकल्याण उमा मुंढे, कर्जत नगराध्यक्षा रजनी गायकवाड, खोपोली नगराध्यक्षा सुमन औसरमल आदी उपस्थित होत्या.वाघ म्हणाल्या, आता उज्ज्वला गॅस निघालाय, महिलांच्या डोळ्यात धूर जाऊ नये म्हणून फुकट गॅस कनेक्शन दिले, पण सिलिंडरसाठी गरिबांनी पैसे कुठून आणायचे, हे सरकार सांगत नाही. महिलांवरील अत्याचार वाढत आहे, पुरु षांच्या बरोबरीने महिला काम करतात, मात्र त्या सुरक्षित नसल्याचे त्यांनी सांगितले.अदिती तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थिती महिलांना योग्य प्रकारे कळावी, त्यांना जाणीव व्हावी यासाठी महिला मेळाव्याची गरज आहे. शरद पवारांमुळे आपल्याला आरक्षणाने संधी मिळाली आहे. त्याचा समाजासाठी व महिलांच्या विकासासाठी काम करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपले बालेकिल्ले राखण्यासाठी आपण सतत सतर्क राहिले पाहिजे, असा सल्ला तटकरे यांनी दिला.आमदार सुरेश लाड यांनी चित्रा वाघ यांचा महिलांना नेहमीच आधार वाटतो. ज्या ज्या वेळी महिलांवर अन्याय होत असतो, त्यावेळी सर्वात आधी पोहचून त्यांना न्याय मिळवून देत असल्याचे सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस