परभणी : मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत, तर दुसरे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर बॅटरीच्या उजेडात दुष्काळाची पाहणी करीत आहेत. यावरून सरकार किती बेफिकीर आहे हे दिसून येते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.जनसंघर्ष यात्रेतंर्गत येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, भाजपा-शिवसेनेच्या राज्यात मराठवाडा पोरका झाला आहे़ या विभागातील सिंचनाचे प्रश्न कायम आहेत़ जायकवाडीचे पाणी वरच्या भागातून उचलले जात आहे़ अप्पर पैनगंगेचेही तसेच झाले आहे़ त्यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे़ २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठी वल्गना करीत ५६ इंच वाल्यांनी पाकिस्तानातून दाऊदला आणण्याची घोषणा केली होती़
‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य उरलेले नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 01:46 IST