शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन होणार!

By admin | Updated: March 14, 2015 04:33 IST

फौजदारी खटल्यातील गुन्हे सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून, यापुढे सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाणार आहे.

मुंबई : फौजदारी खटल्यातील गुन्हे सिद्धतेचा दर वाढविण्यासाठी नेमलेल्या समितीच्या शिफारशी शासनाने स्वीकारल्या असून, यापुढे सरकारी वकिलांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन केले जाणार आहे.न्यायालयात दाखल होणाऱ्या फौजदारी खटल्यांमध्ये गुन्हे सिद्धतेचा दर तुलनेने अत्यंत कमी आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीच्या सगळ्या शिफारशी शासनाने मान्य केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. या शिफारशींमध्ये प्रलंबित खटल्यांचे पुनर्विलोकन, सरकारी वकिलांवर अभियोग संचालनालयाचे नियंत्रण यांचा समावेश आहे. उत्कृष्ट तपास कामाला प्रोत्साहन देण्यासाठी एका सर्वश्रेष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्याला मुख्यमंत्री पदक देणे, पीसीपी एनडीटी कायद्यातील गुन्ह्यात गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अधिक असलेल्या सहायक सरकारी वकिलालाही मुख्यमंत्री पदक देणे, पोलीस अधिकाऱ्यांनी पार पाडलेल्या कर्तव्याबाबत वेगळा गोपनीय अहवाल नमूनादेखील गृहविभाग तयार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सरकारी वकील नेमण्याचे अधिकारशिवाय पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वकिलांचे पॅनल तयार करण्याचे अधिकार दिले गेले आहेत. या पॅनेलमधून विशेष सरकारी वकील नेमण्याचे अधिकार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. न्यायालयात गुन्हे सिद्धतेचा दर वाढण्याच्या दृष्टीने अभियोक्त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण, विशेष सहायक सरकारी वकिलांच्या निवड प्रक्रियेत बदल केला जाणार आहे.