शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

शालाबाह्य विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष;राज्यात पाच लाख शालाबाह्य मुले असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 12:40 IST

शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या जबाबदारीचा शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना विसर

ठळक मुद्देकामगारांच्या मुलांचे नीटपणे ‘टॅपिंग’केले तर या शालाबाह्य मुलांचा प्रश्न सुटू शकेलशिक्षण हक्क कायद्यात नमूद केलेल्या शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष पुणे, सातारा,कोल्हापूर, सोलापूर व नाशिक जिल्ह्यात ७३ हजार खाण कामगारांची मुले शालाबाह्य

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शालाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न योग्यपणे हाताळला गेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शालाबाह्य मुला-मुलींचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी राज्य शासनाने मोहिम हाती राबविली पाहिजे. तेव्हाच रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या , बांधकामाच्या किंवा विट भट्टीच्या ठिकाणी आणि ऊस तोडणी कामगारांबरोबर फिरणाऱ्या मुलां-मुलींसाठी शाळेची दारे उघडतील, असे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.  राज्यातील शाळांची गुणवत्तावाढीची मोठी मोहिम हाती घेतली. लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या जबाबदारीचा शिक्षक आणि शिक्षण अधिकाऱ्यांना विसर झाला आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून शालाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्याबाबत सध्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे आणि बेरोजगारीमुळे परराज्यातील अनेक कुटुंब पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये दाखल होत आहेत. त्यातच ऊस तोडणी कामगारांच्या मुलांच्या प्रश्नाकडे गांभिर्यांने पाहिले जात नाही. त्यामुळेच शहरातील विविध रस्त्यांवर लहान मुले आपल्या पालकांबरोबर वस्तू विकताना दिसतात. इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आई-वडिलांना मदत करताना अढळून येतात.  माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शालाबाह्य मुलांच्या बाबत घेतलेल्या निर्णयावर टीका झाली. शालाबाह्य विद्यार्थी ही सामाजिक सामाजिक समस्या असून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळेच संतुलन संस्थेचे संस्थापक व दगड खाण कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे बस्तु रेगे, शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, महाराष्ट्र शिक्षण हक्क मंचच्या निमंत्रक हेमांगी जोशी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी शालाबाह्य मुला-मुलींच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभिर्याने पहावे, अशी अपेक्षा ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.  --ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगारांच्या मुलांचे नीटपणे ‘टॅपिंग’केले तर या शालाबाह्य मुलांचा प्रश्न सुटू शकेल. राज्यात सध्या सुमारे पाच लाख शालाबाह्य मुले असणाची शक्यता आहे. सध्याचे सरकार स्वत:ला वंचित, उपेक्षितांची बांधिलकी सांगत असेल तर शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शासनाने विशेष मोहिम हाती घेतली पाहिजे.  - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ  -सध्या शासन ‘न नापास’धोरणाचा फेरविचार करणारे आहे. विद्यार्थी नापास होत असेल तर शिक्षण व्यवस्थेत उणीवा असण्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने या उणिवा दूर केल्या पाहिजेत. न नापास धोरणाचा फेरविचार झाल्यास पाचवीनंतर विद्यार्थी नापास होतील. त्यामुळे शालाबाह्य विद्यार्थ्यांचा प्रश्न अधिक गंभीर होईल.  ...........शिक्षण हक्क कायद्यात नमूद केलेल्या शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांना नापास करण्याचे धोरण स्वीकारले तर आरटीईमधील नियमाच्या विसंगत कृती होईल. आरटीईनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार वर्गात प्रवेश देणे गरजेचे आहे. शालाबाह्य मुलांचा प्रश्न एकट्या शासनाने नाही तर समाजातील सर्व घटकांनी सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.- वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ ----शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले. शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने सुध्दा ही चूक करू नये. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व नाशिक जिल्ह्यात सुमारे ७३ हजार दगडखाण कामगारांची मुले शालाबाह्य आहेत. या मुलांसह इतरही मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.- बस्तू रेगे, संस्थापक, संतुलन

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाState Governmentराज्य सरकार