सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:42 IST2018-02-01T04:33:01+5:302018-02-01T05:42:22+5:30
सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.

सरकारला चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या, २६ जानेवारीपासून सुरू होते उपचार
सायखेड (जि.अकोला ) : सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतकºयाचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने आयुष्य संपवित असल्याचे म्हटले आहे.
हरिदास इंगळे यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना त्वरित अकोला येथे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथून नंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सतत पाच दिवस मृत्यूशी झुंज देऊन पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाची साथ न मिळाल्याने त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यातच मायक्रो फायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सरकारला चिठ्ठी :
हरिदास इंगळे यांनी आत्महत्या करण्यापूर्र्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये ‘मी एक कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकरी असूनही सरकारने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे, असे नमूद केले आहे. ही चिठ्ठी त्यांच्या मृत्यूनंतर बुधवारी आढळून आली.