शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस मारहाण प्रकरणातून गोपाळ शेट्टी यांची मुक्तता; ठोस, विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव : न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:21 IST

२००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे.

मुंबई : २००४ मध्ये पोलिस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणातून भाजपचे माजी खा. गोपाळ शेट्टी यांच्यासह पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. एफआयआरमध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचे समर्थन खुद्द तपास अधिकाऱ्याने केलेले नाही. त्यामुळे ठोस, सुसंगत आणि विश्वासार्ह पुराव्यांअभावी दोन्ही आरोपी संशयाच्या फायदा मिळण्यास पात्र आहेत, असे निरीक्षणही यावेळी न्या. सत्यनारायण नावंदर यांनी नोंदवले.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, भाजप कार्यकर्ते नेताजी शिंदे यांना ९ सप्टेंबर २००४ रोजी महाराष्ट्र धोकादायक हालचाली प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चौकशीसाठी कांदिवली येथील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तेव्हा शेट्टी आणि गणेश खंकर हे दोघे रात्री पोलिस ठाण्यात धडकले. पोलिसांनी त्यांच्याकडे कोण आहात याची विचारणा केली असता दोघांनीही हवालदाराला धक्का मारला आणि आयुष्याची वाट लावण्याची धमकी देत आत निघून गेले. त्यानंतर ते डिटेक्शन रूममध्ये गेले आणि तेथील अधिकाऱ्याला शिवीगाळ केली, असा दावा सरकारी वकिलांनी केला.तक्रारदाराची नोंदविलेली साक्ष अत्यंत कमकुवत आणि अविश्वसनीय आहे. तपास अधिकाऱ्याने तपासाबद्दल आणि आरोपपत्राची माहिती दिली. घटना घडली तेव्हा स्वत: उपस्थित असल्याचा किंवा त्याला धमकाविण्यात आल्याबाबत काहीच म्हटले नाही. सरकारी पक्षाच्या दाव्याचे हवालदाराने अंशत: समर्थन केले. मात्र, त्याच्याही साक्षीत विसंगती आहेत आणि उलटतपासणीदरम्यान त्याची साक्ष कमकुवत ठरली, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Gopal Shettyगोपाळ शेट्टीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र