सुखद वार्ता ! दसऱ्याच्या मुहूर्तावर मॉन्सून महाराष्ट्रातून करणार 'सीमोल्लंघन' 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:48 PM2020-10-20T19:48:40+5:302020-10-20T19:51:41+5:30

२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Good news ! Monsoon to be observed across the state on Dussehra | सुखद वार्ता ! दसऱ्याच्या मुहूर्तावर मॉन्सून महाराष्ट्रातून करणार 'सीमोल्लंघन' 

सुखद वार्ता ! दसऱ्याच्या मुहूर्तावर मॉन्सून महाराष्ट्रातून करणार 'सीमोल्लंघन' 

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

पुणे : गेले काही दिवस परतीच्या पावसाचा फटका सहन केलेल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने सुखद वार्ता दिली असून पुढील दोन दिवसात मॉन्सून माघारी जाण्यास सुरुवात होणार असून दसऱ्याच्या दिवशी २५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मॉन्सून माघारी परतणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी,कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
२१ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

२१ ऑक्टोबर रोजी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पालघर, रत्नागिरी, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्घा या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Good news ! Monsoon to be observed across the state on Dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.