Good news! Major decline in the number of new coronaviruses in Maharashtra | गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट

गुड न्यूज! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संखेत मोठी घट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 6500 ते 7000 च्या आसपास कोरोनाचे नवीन रुग्ण सापडू लागल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आज या आकड्यामध्ये कमालीची घट नोंदविली गेली आहे. 


आज राज्यभरात 5,368 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले असून 204 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,11,987 वर गेला असून एकूण मृत्यूंची संख्या 9,026 झाली आहे. राज्यात सध्या 87,681 रुग्ण उपचार घेत आहेत. बरे होण्याचा दर हा 54.37% झाला असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले. 


रविवारी राज्यामध्ये 6555 नवे रुग्ण सापडले होते. तर 151 जणांचा मृत्यू झाला होता. आज मृत्यूचा आकडा वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा 8822 झाला होता. शनिवारी  7074 नवे रुग्ण सापडले होते. यामुळे महाराष्ट्राने कोरोनाबाधितांचा २ लाखांचा आकडा ओलांडला होता. याच दिवशी 295 जणांचा मृत्यू झाला होता.  या तीन दिवसांच्या तुलनेत आज नवीन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे. मात्र, मृत्यूंचा आकडा चिंतेचे वातावरण निर्माण करणारा आहे. 

टाटांची मोठी मदत

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबई महापालिकेला टाटा समुहाने मोठी मदत देऊ केली आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला वीस रुग्णवाहिका, १०० व्हेंटिलेटर्स आणि दहा कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतात त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

टाटा पुन्हा मदतीला धावले! मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका

ठरलं! 8 जुलैपासून हॉटेल्स - लॉज उघडणार, पण...; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

गृहमंत्र्यांनी पोलीस बदल्यांची मुख्यमंत्र्यांना कल्पनाच दिली नसेल; देवेंद्र फडणवीसांना वेगळीच शंका

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good news! Major decline in the number of new coronaviruses in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.