PUBG Mobile's new map will be added; Get a big update tomorrow | लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

लढाईला तयार रहा! PUBG चा नवा मॅप येड लावणार; उद्या मोठी अपडेट मिळणार

नवी दिल्ली : तरुणाईला वेड लावलेला मल्टीप्लेयर बॅटल गेम PUBG Mobile ने मोठी खुशखबर दिली आहे. 7 जुलैला नवीन अपडेट पॅच 0.19.0 रिलीज करण्यात येणार आहे. या अपडेटमध्ये प्लेयर्सना नवीन मॅप Livik मिळणार आहे. हा मॅप Nordic स्टाइलचा असणार आहे. याशिवाय या अपडेटमध्ये Spark the Flame थीम क्लासिक मोड एअरेंगल आणि मिरमार मॅप मिळणार आहे. 


PUBG गेममध्ये Royal Pass सिझन-14 हा 14 जुलैपासून मिळणार आहे. यासोबतच एन्शिअंट सीक्रिट थीम्ड गेमप्ले देखील पहायला मिळू शकतो. अँड्रॉईड युजरसाठी ही अपडेट 1.84 जीबीची असणार आहे. तक iOS साठी ही अपडेट 2.13 जीबी असणार आहे. नवीन Livik मॅप अपडेटनंतरच मिळणार असून 2x2 किलोमीटरच्या मॅपमध्ये जास्तीतजास्त 52 प्लेयर 15 मिनिटांचा गेम खेळू शकणार आहेत. 


तसेच खेळाचा आनंद द्विगुनित करण्यासाठी अनेक एक्सक्लूझिव्ह वेपन्स मिळणार आहेत. यामध्ये SMG 90, मार्क्समॅन रायफल, MP12 आणि मॅप एक्सक्लूझिव्ह व्हेईकल मॉन्स्टर ट्रक असणार आहे. याशिवाय नवीन Livik सुपर फायरआर्म ट्रेनिंग मोड देखील लवकरच यामध्ये येण्याची शक्यता आहे. या मोडमध्ये एक्सपिरिमेंटल ट्रायस क्रेट्सही असणार आहेत. यामध्ये प्लेयरना स्पेशन वेपन्स मिळू शकणार आहेत. नवीन नाव आणि आयकॉनवाले हे वेपन्स चांगली फायटर रेंज ऑफर करण्याची शक्यता आहे. 


दोन मॅप्समध्ये नवीन प्ले मोड
'Spark the Flame' मोड दोन मॅप्समध्ये असणार आहे. हा मोड मिरमार आणि इरेंगल मॅपमध्ये असणार आहे. प्लेयर्स हा मोड निवडल्यानंतरच गेम सुरु करु शकणार आहेत. या मोडमध्ये नवीन वस्तू दिसणार आहेत. यामध्ये स्मॉल स्टॅच्यू, जाएंट स्टॅच्यू आणि स्टॅच्यू कँपही असेल. नव्या मॅपमध्ये एरिना गेमप्ले मोड-टीम गन गेम आणि गेमप्ले थीम- द एनशियंट सीक्रिट देखील असणार आहे. याशिवाय जुने बग्स काढण्यात आले आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

Web Title: PUBG Mobile's new map will be added; Get a big update tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.