शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

महाराष्ट्रासाठी गूड न्यूज! मोदी आज करणार 41 हजार कोटींच्या योजनांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 8:16 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठीच्या जवळपास 41 हजार कोटींच्या योजनांची घोषणा करणार आहेत.

कल्याण- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठीच्या जवळपास 41 हजार कोटींच्या योजनांची घोषणा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल होणार असून, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते राजभवन येथे टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत.मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी एक वाजता कल्याणमधील फडके मैदानात कार्यक्रम होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा झाली होती. तसेच दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभासाठी येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. कपिल पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. रस्त्यावर श्रेयवादाची बॅनरबाजी सुरू असली तरी राजशिष्टाचारानुसार शिंदे पिता-पुत्रास व्यासपीठावर स्थान दिले आहे.महापौर विनिता राणे यांना कार्यक्रमास बोलावले असले तरी त्यांना व्यासपीठावर स्थान दिलेले नाही. बॅनरवर मोदी यांचा कार्यक्रम दुपारी एक वाजता असल्याचे नमूद केला असले तर सरकारी कार्यक्रमपत्रिकेत कार्यक्रमाची सुरुवात चार वाजता होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत. व्यासपीठावरील मोजक्याच लोकांना प्रत्येकी पाच मिनिटे बोलण्याची अनुमती दिली जाणार आहे. तर मोदी यांचे भाषण तब्बल 35 मिनिटे होणार आहे, असे कार्यक्रमपत्रिकेत नमूद केले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkalyanकल्याणMetroमेट्रोPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना