शेतकऱ्यांना दिलासा; १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 02:03 PM2020-04-01T14:03:06+5:302020-04-01T14:30:24+5:30

कोरोनाचे संकट असले तरी राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

good news for farmers; Loan amount deposit on farmers accounts, say ajit pawar rkp | शेतकऱ्यांना दिलासा; १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा

शेतकऱ्यांना दिलासा; १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम जमा

Next

मुंबई : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार या संकटाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. यात राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहे. तसेच, कोरोनाचे संकट असले तरी राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

३१ मार्च २०२० पर्यंत, राज्यातल्या १८ लाख ८९ हजार ५२८ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११ हजार ९६६ कोटी २१ लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४० हजार ९३५ शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार ४०७ कोटी १३ लाख जमा करण्यात आले असून, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ८ लाख ४८ हजार ५९३ शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार ५५९ कोटी ८० हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले होते. याचबरोबर, ज्या शेतकऱ्यांनी सन २०१७ ते २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास, त्या शेतकऱ्यांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. तसेच, ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असेही अजित पवार यांनी सांगितले होते.
 

Web Title: good news for farmers; Loan amount deposit on farmers accounts, say ajit pawar rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.