गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:55 AM2021-07-28T07:55:52+5:302021-07-28T07:56:26+5:30

विदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे.

Good news! The dam began to fill; 18% increase in water storage in the state in 10 days | गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

गुड न्यूज! धरणे भरू लागली; राज्यात १० दिवसांत पाणी साठ्यात १८ टक्के वाढ

Next

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने धरणांमधील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दहा दिवसांत मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ३,२६७ धरणांमधील पाणी साठा ३० वरून ४८ टक्के झाला आहे. ही वाढ तब्बल १८ टक्के आहे. 
गेल्या आठवड्यापासून पावसाचे दमदार आगमन झाले. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

मुंबई, कोकणात ५८ टक्के  
मुंबई, कोकणात १० दिवसांत ४० वरून ५८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्यावर्षी ५६ टक्के साठा होता.

विदर्भात पावसाची प्रतीक्षा
विदर्भात नागपूर व अमरावती विभागातील धरणांमधील एकूण जलसाठा ३३.५ वरून ४१ टक्के झाला आहे. विदर्भातील धरणे अजून सरासरी ५० टक्केही भरलेली नाहीत.

पश्चिम महाराष्ट्रात दुप्पट साठा  
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला असून १० दिवसांत जलसाठा ३० वरून ६४ टक्के झाला आहे. 

उत्तर महाराष्ट्रात १० टक्के वाढ उत्तर महाराष्ट्रातील धरणामध्ये १७ जुलैला असलेला २१ टक्के साठा आता सरासरी ३१ टक्के झाला आहे.   

मराठवाड्यात केवळ ३३ टक्के साठा
मराठवाड्यातील ९६४ धरणांत सरासरी केवळ ३३ टक्के साठा आहे. १० दिवसांपूर्वी तो २९ टक्के होता. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Web Title: Good news! The dam began to fill; 18% increase in water storage in the state in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी