शिक्षणास ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: July 11, 2014 02:01 IST2014-07-11T02:01:50+5:302014-07-11T02:01:50+5:30

आर्थिक तरतुदी आणि विविध क्षेत्रंना चालना देण्यासाठी नवी विद्यापीठे सुरू करण्याचे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हणायला हवे.

'Good day' for education | शिक्षणास ‘अच्छे दिन’

शिक्षणास ‘अच्छे दिन’

यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन शिक्षणसंस्था सुरू करतानाच गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न, त्यादृष्टीने आर्थिक तरतुदी आणि विविध क्षेत्रंना चालना देण्यासाठी नवी विद्यापीठे सुरू करण्याचे पाऊल निश्चितच स्वागतार्ह म्हणायला हवे.  त्याचप्रमाणो मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य, बदलत्या काळानुसार ई-लर्निगचे ओळखलेले महत्त्व, यूजीसीची पुनर्रचना या चांगल्या गोष्टी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आहेत. 
एका बाजूला आजच्या काळाशी सुसंगत राहून आयआयटी, आयआयएम्स व एम्सची संख्या वाढवताना हिमालयाच्या अभ्यासासाठी उत्तराखंडमध्ये स्वतंत्र अॅकॅडमी किंवा हस्तकलेसाठी अकादमी स्थापन करण्याचे पाऊल उचलून त्यांनी व्यापक दृष्टिकोन दाखवून दिला आहे. पारंपरिक ज्ञानाचे जतन, संवर्धन करतानाच आधुनिकीकरणाची कास धरण्याचे प्रयत्न आहेत. 
वैद्यकीय, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या तिन्ही क्षेत्रंकडे विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. देशभरामध्ये 5 नवीन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) आणि 5 नवीन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) सुरू करणार आहेत. देशभरात डेंटल सुविधेसह नव्याने 12 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. 
 
शिक्षणक्षेत्रसाठी अच्छे दिन येणार असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केलेल्या विविध तरतुदींवरून दिसून येत आहे. कोणत्याही आर्थिक प्रगतीचा पाया अखेर शिक्षणातूनच तयार होतो याचे नेमके भान राखून केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध तरतुदी केलेल्या आहेत. 
 
औद्योगिकदृष्टय़ा इंडस्ट्रीयल कॉरीडॉर म्हणून या विद्येच्या माहेरघरा असलेल्या पुणो शहराचे महत्त्व वाढले आहे. त्याचप्रमाणो विज्ञान क्षेत्रतील संशोधनाला गती देण्यासाठी स्वतंत्र क्लस्टर सुरू करण्यात येणार आहे. 
 
1हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र पीपीपी मॉडेलअंतर्गत एक हस्तकला अॅकॅडमी सुरू केले जाणार आहे. त्यासाठी 3क् कोटी तरतूद आहे. क्रीडा क्षेत्रस प्रोत्साहन देण्यासाठी व त्यातून चांगले खेळाडू घडवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा अकादमी बनवली जाणार आहे. मणीपूरमध्ये स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे.  
2कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून शिक्षण व ज्ञानाचा प्रसार प्रभावीपणो होतो. त्यादृष्टीने देशभरातील हे जाळे सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून, अशी 
6क्क् कम्युनिटी रेडिओ सेंटर्स स्थापन केली जाणार आहेत. 
3पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट आणि कोलकत्यातील एसआरएफटीआय या संस्थांना राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र दर्जा दिला जाणार आहे. त्यांचे या क्षेत्रतील महत्त्वपूर्ण योगदान व त्या माध्यमातून घडणारे वैविध्यपूर्ण कलाकार लक्षात घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरचा विशेष दर्जा दिला जाणार आहे.  
 
सर्व शिक्षण प्रक्रियेचा आधार असतो शिक्षक. त्यांच्या प्रशिक्षण आणि गुणात्मक विकासासाठी पं. मदनमोहन मालवीय टिचर्स ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी स्वतंत्र तरतूद आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात इंटरनेटच्या जाळ्याचा विस्तार, ई-लर्निगचा प्रसार व व्हच्यरुअल क्लासरूम यांच्यासाठी 1क्क् कोटींची तरतूद आहे. तसेच नॅशनल सेंटर फॉर ह्युमॅनिटीचीही स्थापना केली जाणार आहे. 
 
नवी प्रेस समाजातील अंध मुलांना दृष्टी देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सुरू करण्याची घोषणा सामाजिक भान अधोरेखित करणारी आहे. 
 
ब्रेलमध्ये अशी पुस्तके उपलब्ध होण्यास चालना मिळाल्यास त्यातून कित्येक दृष्टीहिनांना वाचनाचे नवे जग खुले होऊ शकणार आहे. 

 

Web Title: 'Good day' for education