शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 16:33 IST

गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे...

पुणे : गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे. तसेच आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीत देखील नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच भाजप व मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेनेकडून देखील भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औंरंगाबाद शहराच्या संभाजीनगर या नामांतरावरून मोठं विधान केले आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील विकास कामांविषयीचर्चा केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळेच औरंगाबादकरांनो,महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पहिल्याच सभेत संभाजीनगर नामांतराचा ठराव मंजूर करून दाखवतो, असे मोठे विधान पाटील यांनी यावेळी केले आहे. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर पण... मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात. त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस