"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 04:22 PM2021-01-04T16:22:47+5:302021-01-04T16:33:34+5:30

गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे...

"Give power to BJP in Aurangabad Municipal Corporation, Sambhajinagar will approve the proposal in the first meeting." | "औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

"औरंगाबाद महापालिकेत सत्ता द्या,पहिल्याच सभेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून दाखवतो!"

googlenewsNext

पुणे : गेले काही दिवस राज्यातील राजकारण औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर हे नामांतर करण्यावरून चांगलेच तापले आहे. तसेच आता औरंगाबाद महापालिका निवडणुकीत देखील नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच भाजप व मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेनेकडून देखील भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. मात्र याचदरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औंरंगाबाद शहराच्या संभाजीनगर या नामांतरावरून मोठं विधान केले आहे. 

पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरातील विकास कामांविषयीचर्चा केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यास शिवसेनेने भूमिका घ्यावी. याविषयात राजकारण करू नये. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलली जाणे हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. तसेच ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायचे ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळेच औरंगाबादकरांनो,महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पहिल्याच सभेत संभाजीनगर नामांतराचा ठराव मंजूर करून दाखवतो, असे मोठे विधान पाटील यांनी यावेळी केले आहे. 

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नावे बदलण्याचा निर्णय न्यायालयात गेला. प्रस्ताव मागे घेतल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात द्यावे लागले. आता नव्याने प्रक्रिया करावी लागेल. पालिकेत ठराव करून राज्य शासनाला पाठवावा लागेल. नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट असल्याचेही पाटील म्हणाले.

राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर पण... 
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रांतीय लोकांबाबत भूमिका स्पष्ट करीत नाही तोपर्यंत युतीबाबत चर्चा होणार नाही. देशभरात मराठी माणसे राहतात. त्यांना अशी वागणूक मिळत नाही. मनसेचा नेमका कशाला विरोध आहे हे कळत नसल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. अद्याप तरी दोन्ही पक्षांच्या पातळीवर युतीची कोणतीही चर्चा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: "Give power to BJP in Aurangabad Municipal Corporation, Sambhajinagar will approve the proposal in the first meeting."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.