"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:41 PM2024-05-11T12:41:14+5:302024-05-11T12:42:51+5:30

Lok Sabha Election 2024 Shivraj Singh Chouhan And Rahul Gandhi : शिवराज सिंह चौहान य़ांनी राहुल गांधींवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. 

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi is ranchhod das on leaving amethi seat says Shivraj Singh Chouhan | "राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."

"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रोड शो करण्यासाठी नीमचमध्ये पोहोचले. या जागेवरील भाजपा उमेदवारासाठी त्यांनी मंदसौरमध्ये जाहीर सभा घेतली. शिवराज सिंह चौहान य़ांनी राहुल गांधींवर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. 

"भाजपाचे उमेदवार सुधीर गुप्ता मंदसौर-नीमच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर मीही माझ्या मूळ गावी विदिशामधून निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच जिंकेन" असं म्हटलं आहे. तसेच जागा बदलल्याबद्दल त्यांनी राहुल गांधींना 'रणछोड दास' म्हणत टीका केली आहे. 

"जो नेता स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, तो आपल्या पक्षाला निवडणूक जिंकून देऊ शकतो का? धोकादायक खेळ खेळणाऱ्या काँग्रेसला मत देऊन फायदा नाही कारण त्यांची विचारसरणी भारतीय नाही" असंही शिवराज यांनी म्हटलं आहे. 

नीमच जिल्ह्यातील जावद विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार सुधीर गुप्ता यांच्यासाठी आयोजित केलेल्या रोड शोमध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री म्हणाले की, "इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल कोणालाही माहिती नाही."

"मतदारांनी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे उमेदवार निवडावे कारण ते विश्वासू आणि देशाच्या विकासासाठी वचनबद्ध आहेत." भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी मंदसौरमध्ये गुप्ता यांच्यासाठी रोड शोचे नेतृत्व केले आणि धार लोकसभा मतदारसंघातील महू विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या उमेदवार सावित्री ठाकूर यांच्यासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासोबत जाहीर सभा घेतली आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi is ranchhod das on leaving amethi seat says Shivraj Singh Chouhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.