शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:02 IST

साताऱ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं.

Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगले तापले आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला. विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करत एवढ्या मोठ्या व्यवहाराची माहिती नव्हती का सवाल विचारला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे अजित पवारांनी आपल्यावर सध्या होत असलेल्या दोन मोठ्या आरोपांवर अत्यंत स्पष्ट आणि मिश्किल शब्दात भाष्य केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे नुकताच भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तर दिले. तर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवरही मिश्किल टिप्पणी केली.पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन खरेदीवरुन विरोधकांनी 'एवढ्या मोठ्या व्यवहाराची अजित पवारांना कल्पना कशी नाही?' असा थेट प्रश्न विचारत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

"आता घडायला नको होती अशी घटना घडली. मला त्याच्याबद्दल माहिती नव्हतं, मी म्हटलं माहिती घेऊन सांगतो. काहीजण म्हणाले एवढी मोठी माहिती अजित पवार यांना  कशी नाही. अरे बाबा दादा सकाळी सहा वाजता कामाला लागतो, रात्री दहा-अकरा वाजता घरी जातो. त्याच्यामुळे मला माहिती नव्हती. नंतर मी माहिती घेतली पण त्यात काहीच व्यवहार झाला नाही. एक रुपया कुणाला दिला नाही आणि घेतला ही नाही. आता त्यावर तपास करण्यासाठी कमिटी तयार करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे, तिघांवरती गुन्हा दाखल झाला आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं.

७० हजारमधील १०० कोटी तरी द्या

"मी काम करताना एका पण माणसाने यावं आणि सांगावं की अजित पवार काम करताना आमच्याकडे चहाचा मिंदा आहे. मी कोणाचाही पाच पैशाचाही मिंदा नाही एवढं माझं काम चोक असतं. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर ७० हजार कोटीचा आरोप झाला. मी म्हटलं ७० हजार कोटी मधले शंभर कोटी मला द्या बाकी सगळे तुम्ही घेऊन जा. १०० कोटी मध्ये माझ्या दहा पिढ्या बसून खातील पण मला कोणी पैसे दाखवत नाही आहेत. यासाठी माझ्या नातेवाईकांवर २२ ठिकाणी धाडी टाकल्या. मला त्याच्यामध्ये खूप त्रास झाला पण मी ते सहन केलं. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेचे प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होतात काही त्याच्यामध्ये आमचे कौतुक केले जाते काही चुका झाल्या तर आम्हाला नाकारले जाते," असंही अजित पवार म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar addresses Parth Pawar's land deal and corruption allegations.

Web Summary : Ajit Pawar clarified that he was unaware of Parth Pawar's land deal. He also responded to ₹70,000 crore irrigation scam allegations, stating he'd accept ₹100 crore, humorously dismissing the charges and asserting his integrity.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारparth pawarपार्थ पवारSatara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेस