शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेमुळे गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द

By admin | Updated: October 8, 2015 05:47 IST

‘कल चौदहवीं की रात थी...’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील

मुंबई : ‘कल चौदहवीं की रात थी...’, ‘ये दिल ये पागल दिल मेरा..’ आणि ‘हंगामा है क्यूँ बरपा...’ अशा एकाहून अनेक सरस गझला लोकप्रिय करणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पटियाला घराण्याचे गायक गुलाम अली हे केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणाने शिवसेनेने केलेल्या विरोधामुळे शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणारा त्यांचा गझल गायनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. सीमेवर भारतीय सैनिकांवर पाकिस्तानकडून भ्याड हल्ले होत असताना गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द केला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करील, असा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी सायंकाळी भेट घेऊन कार्यक्रम रद्द केल्याची माहिती दिली.गुलाम अली यांच्या गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी ९ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यास शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस अक्षय बर्दापूरकर यांनी विरोध दर्शविला होता. षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. (विशेष प्रतिनिधी)शिवसेनेची हिंदुत्ववादी भूमिका झाली ताठरशिवसेनेने यापूर्वीही गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध केला होता. नुसरत फतेहअली खान यांचा कार्यक्रमही शिवसेनेने होऊ दिला नव्हता. तसेच भारत-पाकिस्तान दरम्यान क्रिकेट सामने खेळवण्यासही शिवसेना सतत विरोध करीत आली आहे. मात्र पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी दिलीप वेंगसरकर यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.मुख्यमंत्र्यांनी दिली होती हमीअली यांच्या कार्यक्रमाकरिता पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र तरीही संयोजकांनी कार्यक्रम रद्द केला.सोयीस्कर विसर ?... अली यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला असला तरी गेल्या वर्षी २१ नोव्हेंबर २०१४ रोजी याच षण्मुखानंद सभागृहात गझल गायन केले होते. त्या वेळी शिवसेनेने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. आता त्यांनी सोयीचे राजकारण केल्याची चर्चा आहे.गुलाम अली केवळ एक गायक नव्हे तर शांतिदूत आहेत, त्यांना सीमेचे बंधन असू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला होणारा विरोध दुर्दैवी आहे. - मुख्तार अब्बास नकवी, केंद्रीय मंत्रीशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील गुलाम अली यांचे फॅन आहेत. भारतीय जवानांवर गोळीबार होत असताना पाकिस्तानी गायकाच्या गझला ऐकणे योग्य होणार नाही, ही शिवसेनेची भूमिका पटल्याने आपण हा कार्यक्रम रद्द करत आहोत.- रणधीर धीर, कार्यक्रम संयोजक