शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

‘गरबा’ फेम सॉँगची यंदाही धूम

By admin | Updated: October 1, 2016 13:16 IST

येत्या नवरात्रोत्सवात बॉलिवूडमधील काही गाणी ऐकायला मिळणार आहेत.

सतीश डोंगरे, ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १ -  बॉलिवूडमध्ये अविस्मरणीय चित्रपट आणि गाण्यांची संख्या तशी खूप मोठी आहे; मात्र काही गाणी अशीही आहेत, जी केवळ सणासुदीच्या काळात हमखास कानावर पडतात. येत्या नवरात्रोत्सवात यातील काही गाणी आपल्याला ऐकावयास मिळतीलच. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या नव्या गाण्यांबरोबरच जुन्या गाण्यांना आजही तरुणाईकडून पसंती मिळते. मग ते अलीकडच्या काळातील ‘रामलीला’मधील ‘नगाडे संग ढोल बाजे’ हे गाणे असो वा महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सुहाग’मधील ‘हे राम रे सबसे बडा तेरा नाम’ हे गाणे असो. यावर तरुणाई बेंधुद होऊन गरबा, दांडिया खेळताना दिसते. अशाच काही फेस्टिव्हल गाण्यांचा घेतलेला हा आढावा...
 
नगाडे संग ढोल बाजे 
‘रामलीला’ या सुपरहिट चित्रपटात दीपिका पादुकोन आणि रणबीर सिंग यांच्यावर चित्रित केलेल्या ‘नगाडे संग ढोल बाजे’ हे गाणे यंदाच्या नवरात्रोत्सवात धूम उडवून देईल, यात शंका नाही. खरं तर ‘रामलीला’मधील सर्वच गाणे गरबा, दांडिया खेळण्यासाठी रचलेले असावेत. त्यामुळे ‘लहू मुॅँह लग गया’ हे गाणेही नवरात्रोत्सवात धूम उडवून देईल. 
 
ढोली थारो ढोल बाजे 
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे ‘ढोली तारो ढोल बाजे’ हे गाणे गेल्या कित्येक वर्षांपासून नवरात्रोत्सवातील आवाज बनले आहे. नवरात्रोत्सव अन् ढोली थारो ढोल बाजे हे गीत जणू काही समीकरणच बनले आहे. ब-याचदा ऐश्वर्या आणि सलमानने या गाण्यात केलेल्या डान्सची लोक दांडिया खेळताना कॉपी करताना बघावयास मिळतात. 
 
राधा कैसे न जले
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याच्या सुपरहिट ‘लगान’ या चित्रपटातील ‘राधा कैसे न जले’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवात हमखास वाजविले जाते. या गाण्याच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन दांडिया खेळत असते. त्यामुळे हे गाणे नवरात्रोत्सवात आॅल टाइम फेव्हरेट ठरत आहे. 
 
शुभारंभ 
‘काय पो छे’ या चित्रपटातील ‘शुभारंभ’ हे गाणेदेखील गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सवात ऐकावयास मिळत आहे. दांडिया तथा गरबा खेळण्यासाठी हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. गरबा खेळताना गाण्यात राज कुमार यादव याने धरलेला ताल लोक कॉपी करताना बघावयास मिळतात. 
 
ओ रे गोरी 
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर ‘आप मुझे अच्छे लगने लगे’मध्ये एकत्र आलेल्या ऋतिक रोशन आणि अमिशा पटेल यांच्या ‘ओ रे गोरी’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवातील फेव्हरेट सॉँग आहे. दांडिया खेळण्यासाठी हे गाणे लोकांचे फेव्हरेट ठरत आहे. 
 
मन डोला रे 
‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटातील ‘मन डोला रे’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवात ऐकावयास मिळते. वास्तविक या गाण्याचा दांडिया किंवा गरबा खेळण्याशी फारसा संबंध नाही. परंतु गाण्यातील म्युझिक दांडिया तथा गरबा खेळण्यासाठी परफेक्ट असल्याने हे गाणे गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात वाजविले जाते. 
 
हे राम रे, सबसे बडा तेरा नाम 
१९७९ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या ‘सुहाग’ या चित्रपटातील ‘हे राम रे, सबसे बडा तेरा नाम’ हे गाणे तर जणू काही लोकांच्या गळ्यातील ताईतच बनले आहे. नवरात्रोत्सवात आजही हे गाणे इतर गाण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात वाजविले जाते. 
 
जय अंबे जगदंबे मॉँ
नाना पाटेकर यांच्या ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील ‘जय अंबे जगदंबे मॉँ’ हे गाणेदेखील नवरात्रोत्सवातील फेव्हरेट सॉँग आहे. गेल्या काही वर्षांपासून या गाण्याची क्रेझ कायम आहे.