'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 20:28 IST2022-04-07T20:14:33+5:302022-04-07T20:28:36+5:30

शिवसेनेच्यावतीनं मुंबई विमानतळावर आज शिवसेना खासदार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Gaja Marane was also welcomed like this sudhir mungantiwar on Sanjay Raut | 'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला

'गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं', संजय राऊतांच्या स्वागतावर मुनगंटीवाराचा टोला

मुंबई-

शिवसेनेच्यावतीनं मुंबई विमानतळावर आज शिवसेना खासदार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत संजय राऊत यांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं. शिवसेनेकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात आलं. तसंच शिवसैनिकांकडून भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पुण्यात गुंड गजा मारणेचंही असंच स्वागत झालं होतं, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. 

"पुण्यात गजानन मारणे नावाचा गुंड होता, तो सुटल्यानंतरही त्याचं स्वागत झालं. मग तो आदर्श पुरूष आहे का? प्रत्येकाने कुटुंबातील सदस्याला सांगायचं तू गजानन मारणेच हो, हे सांगण्यासारखं आहे का?", अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांच्या स्वागतावर केली आहे.

मुंबईत राऊतांचं जोरदार स्वागत
ईडीनं संजय राऊत यांच्याशी निगडीत अलिबाग येथील जमीन आणि दादर येथील फ्लॅट जप्त केला. त्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचं आयएनएल विक्रांत संबंधिचं प्रकरण उघडकीस आणलं आणि सोमय्या यांनी ५८ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप केला. त्यानंतर राऊत यांचं मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्याची तयारी शिवसेनेच्यावतीनं करण्यात आली होती. 

ढोल-ताशांच्या गजरात संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. संजय राऊत यांनी मुंबईत दाखल होताच किरीट सोमय्यांवर शरसंधान केलं. सोमय्यांनी आरोपांवर उत्तर दिलं नाही हाच त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा पुरावा आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Gaja Marane was also welcomed like this sudhir mungantiwar on Sanjay Raut