शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांच्या मार्गात गडकरी!

By admin | Updated: December 20, 2014 03:25 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. दोघेही रेशीम बागेच्या तालमीत तयार झाल्याने एकमेकांचे डावपेच ते चांगलेच ओळखून आहेत. मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांची निवड झाल्यापासून तर दोघांमधील ‘वैचारिक’ दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. शुक्रवारी विधानसभेत विदर्भाच्या प्रश्नावर बोलत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘राज्याचा विकास यापुढे विदर्भकेंद्रित असेल’ असे सांगितले, तर त्याच वेळी विधान भवनच्या प्रांगणात आलेल्या गडकरींनी मात्र राज्याच्या समतोल विकासाचा राग आळवला!देवेंद्रला मीच मोठे केले - खडसे देवेंद्र फडणवीस यांना मीच सक्रिय केले. विदेशात भाषणांची संधी दिली. देवेंद्रला मीच मोठे केले, असे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नवा वाद छेडला. > यापुढे विदर्भकेंद्रित विकास - मुख्यमंत्री विधानसभेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची यापुढील दिशा ही विदर्भकेंद्रित असेल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, मराठी माणसांचे एकच राज्य केले नाही तर मुंबई गुजरातकडे जाईल, या भीतीने विदर्भाला सोबत घेण्यात आले आणि त्याला विदर्भाने ओ दिला. मात्र त्या वेळी समतोल विकासाचा विदर्भाला दिलेला शब्द नंतर पाळण्यात आला नाही. विदर्भात अन्यायाची भावना अन्याय झाला म्हणून आहे, राजकारणापोटी नाही. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३७१(२) नुसार निधीच्या समन्यायी वाटपाचे दिलेले निर्देश गेल्या १५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी पायदळी तुडवले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्राकडे निधी कसा वळविला, याचीही आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्याचा समतोल विकास हवा - गडकरीच्स्वतंत्र विदर्भाबाबत मी शंभरवेळा बोललो असून आपल्याला त्यासंबंधी पुन्हा बोलायचे नाही, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशी केवळ वेगवेगळ््या विभागांच्या विकासापुरती मर्यादित भूमिका घेऊन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाण्याची परिस्थिती बिकट आहे. च्राज्यासमोरील समस्यांचे संधीत रूपांतर करून भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि रोजगारनिर्मिती करणे याला प्राधान्य दिले पाहिजे. पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. प्रदूषणविरहित इंधनावर चालणारी पहिली बससेवा नागपूरमध्ये सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.